'समृद्धी'चे कामगार ठरतायेत कोरोना सुपर स्प्रेडर

आरोग्याच्या बाबतीतही सर्वसाधारण कामगारांसाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध नसून यासाठीही कॅम्पसबाहेर जाण्याची वेळ येते.
Samrudhi Highway
Samrudhi Highway Sakal

पांढुर्ली (जि. नाशिक) : सध्या समृद्धी महामार्गाचे (Samrudhi Highway) काम प्रगतीपथावर आहे. शिवडे, सोनांबे रस्त्यालगत हैद्राबादच्या बीएससीपीएल कंपनीकडून मोठा कॅम्पस लावून काम केले जात आहे. या कामासाठी हजारो कामगारांची वर्दळ असते. यामुळे हे कामगार कोरोना सुपर स्प्रेडर ठरत आहेत. (Workers on the Samrudhi Highway project are becoming corona super spreaders)

शिवडे - सोनंबे मुख्य वाहतुकीचा रस्ता आणि शिवडे - घोरवड प्रयाग तीर्थ व घोरवड गावाकडे जाणाऱ्या उपरस्त्यावर रात्रंदिवस कामगारांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीचे ठिकाण असून, स्थानिक नागरिकही ये - जा करतात. दिवसभर शेकडो कामगार विनामास्क, विना सोशल डिस्टन्स ठेवून वर्दळ करतात. सुट्टीच्या दिवशी वा रिकाम्या वेळेत समृद्धी महामार्गाचा कॅम्पस सोडून परिसरातही कामगारांची भटकंती असते. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती अधिक असल्याने त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. परप्रांतीय कामगारांच्या मते कॅम्पसमध्ये सर्वच कामगारांना कॅन्टींन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे किराणा बाजार, चहा, नाश्त्यासाठी ते बाहेर पडतात. आरोग्याच्या बाबतीतही सर्वसाधारण कामगारांसाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध नसून यासाठीही कॅम्पसबाहेर जाण्याची वेळ येते.

Samrudhi Highway
नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

स्थानिक कामगारांना टाळले?

बीएससीपीएल कंपनीत चालक असलेल्या शिवडेतील युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे कामगारांच्या वैद्यकीय सुविधांचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाने तर समृद्धी महामार्ग कामगारांसाठी वेगळा कॅम्पस लावून ७० कामगारांचे लसीकरण केले. मात्र, यात स्थानिक कामगारांना टाळले असल्याची चर्चा आहे.

Samrudhi Highway
घरचा साठवलाच, विकत घेऊनही कांदा साठवणूक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com