Nashik News : ठेकेदाराचे पैसे परत करण्यासाठी कामागाराचा बनाव; पितळ उघडे

Fraud
Fraudesakal

Nashik News : चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथे ऊसतोड कामगारांच्या मुकादमने उचल घेतलेले पैसे वसुलीसाठी दोघा ऊसतोड मजुरांना पिंजऱ्यात कोंडून ठेवल्याची चर्चा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. (Workmen fraud to recover contractor money nashik news)

यात पश्‍चिम भारत मजदूर अधिकार मंचचे लखन पवार यांनी तक्रार केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. मात्र या प्रकरणाची संबंधित बंधक मजुराचे नातेवाईक व मंचच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष प्रत्यक्ष चिंचगव्हाण येथे भेट दिल्यानंतर हा सर्व प्रकार मजुरानेच घडवून आणल्याचे उघड झाले आणि मजूराचा डाव फसला. आदिवासी विद्रोही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुका पोलिसांसह चिंचगव्हाण येथे भेट दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

चिंचगव्हाण येथे संगमनेर कारखान्याच्या ऊस तोडीसाठी काही कुटुंब गेले होते. भावडू मोरे या ऊसतोड कामागाराने मुकादम गोविंदा बोराडे यांच्याकडून ऊसतोडीसाठी दीड लाख रूपये उचलही घेतली. ऊस वाहतुकीच्या दरम्यान एक बैलाचा मृत्यू झाला होता. यातून ऊसतोड कामगार व मुकादम यांच्यात वाद झाले.

यातून श्री. बोराडे यांनी भावडू यास दिलेले पैसे परत मागितले. यावर भावडू याने मुकादम यांना मला तुम्ही स्वत: बंधक बनवा आणि माझे नातेवाईक तुमचे पैसे देतील असा बनाव रचला. यावर भावडू याचे शालक यांनी भावडू यास पन्नास हजार रुपये दिले. मात्र हे पैसे भावडू याने मुकादम यांना न देता स्वत:जवळ ठेवले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Fraud
Unseasonal Rain : बागलाणला पुन्हा अवकाळीचा तडाखा

मात्र याच दरम्यान ऊसतोड मजूरांना वसुलीसाठी मुकादम याने पिंजऱ्यात कोंडले असल्याचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित झाले. यानंतर या कामगारांना सोडावे, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पश्‍चिम भारत मजदूर अधिकार मंचचे लखन पवार यांनी केली.

भावडू बंधक असल्याचा समजताच नातेवाईक व मंचचे कार्यकर्ते तालुका पोलिस ठाण्यात गेले. आदिवासी विद्रोही सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.२२) तालुका पोलिस ठाणे गाठले.

यानंतर या प्रकरणाची शहनिशा करण्यासाठी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सर्वांना चिंचगव्हाण येथे नेल्यानंतर उपस्थित मजुरांनी पोलिस व पदाधिकाऱ्यांना भावडू मोरेचा हा बनाव सांगितले आणि भावडूचा सर्व बनाव उघड झाला.

मात्र या प्रकाराची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आणि भावडूचे सर्व पितळ उघड झाले. खबरदारी म्हणून पोलिसांनी भावडूला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देत पावती करुन घेतली. कामगारांना बंधक बनविल्याबद्दल कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा मात्र दाखल झाला नाही.

Fraud
Nashik Mission Bhagirathi : ‘मिशन भागीरथी प्रयास’ मध्ये नांदगाव तालुका उत्कृष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com