Jal Jeevan Mission : जलजीवनच्या 32 योजनांची कामे कागदावरच

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशनची सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी केवळ तीन महिन्यांची मुदत शिल्लक असतानाही ३२ पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप सुरू झालेली नसल्याचे समोर आले आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal

Jal Jeevan Mission : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशनची सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी केवळ तीन महिन्यांची मुदत शिल्लक असतानाही ३२ पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप सुरू झालेली नसल्याचे समोर आले आहे.

या ३२ पाणीपुरवठा योजना फेरआराखडे तयार करण्याच्या कारणामुळे अद्याप सुरूच झालेल्या नाहीत.(Works of 32 schemes of Jal Jeevan only on paper nashik news)

ग्रामीण पुरवठा विभागाकडील आकडेवारीनुसार आतापर्यंत २०० योजनांची कामे पूर्ण झाली असून, एक हजार २२ कामे प्रगतिपथावर आहेत. यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर पुढील तीन महिन्यांमध्ये ८२८ योजना पूर्ण करण्याचे आव्हान आहे. जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत.

या एक हजार २२२ योजनांमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या, पण नव्याने विस्तारीकरण केल्या जात असलेल्या रेट्रोफिटिंग योजनांची संख्या ६८१ असून, त्यांच्यासाठी ७१२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पूर्णत: नवीन असलेल्या पाणीपुरवठा योजनांची संख्य ५४१ आहे. या नवीन योजनांसाठी ६९७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.

या कामांची तपासणी करण्यासाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स या त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेने डिसेंबरपर्यंत ९८५ कामांची किमान एकदा तपासणी केली आहे. यावरून ९८५ पाणीपुरवठा योजनांची कामे किमान २५ टक्के पूर्ण झाली आहेत. तसेच या त्रयस्थ संस्थेकडून ५९८ कामांची दोनदा तपासणी केली असल्याने एवढी कामे ६० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाली आहेत.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या आधाराने विचार करता पुढील तीन महिन्यांमध्ये पाणीपुरवठा योजनांची हजार कामे पूर्ण करण्याचे आव्हान विभागासमोर आहे. यातील १७२ योजना पूर्ण झाल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील आकडेवारीनुसार ३५० कामे ५० टक्के पूर्ण झाली आहेत, तसेच ३०० कामे ७५ टक्के झाली असून, १५० कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत. तर ३२ कामांना अद्याप प्रारंभ झालेला नाही. या योजनांचे फेरआराखडे तयार करून मंजुरीसाठी पुन्हा सादर केली आहेत. त्यास मंजुरी आलेली नाही.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : प्रतिकुटुंबाला आता १२०० रुपयांची पाणीपट्टी

''जिल्ह्यात एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत अखेरची मुदत आहे. या मुदतीत एक हजार योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने निश्चित केले आहे. ३२ कामांचे फेरआराखड्यांना मंजुरी मिळाल्यास लागलीच कामांना सुरवात होईल. कामे वेळात करण्यावर भर आहे.''- संदीप सोनवणे (प्रभारी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प.)

...हे आहेत प्रमुख अडथळे

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ठेकेदारांना कामांची मुदतवाढ देताना, तसेच देयके तयार करताना कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र ठेकेदारांकडून केलेल्या कामाचे बिल तयार करून त्याची मागणी केली असता झालेल्या कामाच्या केवळ ४० टक्क्यांपर्यंतच देयक मंजूर केले जाते.

ही कामे मोठ्या रकमेची असून, आधी केलेल्या कामाचे बिल मिळत नसल्यामुळे ठेकेदारांना पुढील काम करण्यासाठी अडचणी येत आहेत.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 1175 योजना पूर्ण करण्याचे आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com