World Anti Drug Abuse Day cycle rally
World Anti Drug Abuse Day cycle rallyesakal

World Anti Drug Abuse Day : ‘मीच माझा वैरी’चा संदेश देत लक्षवेधी सायकल रॅली!

जागतिक अंमली पदार्थसेवन विरोधी दिनानिमित्ताने दिला संदेश

World Anti Drug Abuse Day : जागतिक अंमली पदार्थसेवन विरोधी दिनानिमित्ताने नाशिक पोलीस आयुक्तालय व नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सायकल रॅली काढण्यात आली.

अंमली पदार्थांच्या घातक दुष्परिणाम विषयीचे संदेश देणारे बोर्ड प्रत्येकाच्या सायकलला लावण्यात आले.

‘मीच माझा वैरी’ संकल्पनेंतर्गत सायकल रॅलीतून नाशिककरांना अंमलीपदार्थ, तंबाखू, गुटखा, सिगारेट आदींपासून परावृत्त होण्यासाठीचे संदेश दिला. या सायकल रॅलीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. (World Anti Drug Abuse Day eye catching bicycle rally in city nashik news)

esakal
esakal

गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयातून या सायकल रॅली शनिवारी (ता. २४) सकाळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

पोलीस बँडच्या सुमधुर संगीताने रॅलीचा प्रारंभ झाला. सकाळच्या रम्य वातावरणात "स्टॉप ड्रग एडिक्शन", "अंमली पदार्थाची नशा, आयुष्याची दुर्दशा" अशा घोषणा देत रॅलीच्या मार्गात जगजागृती व प्रबोधन करण्यात आले.

अतिशय शिस्तबद्धरितीने काढण्यात आलेली सायकल रॅली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. रॅलीच्या प्रारंभी वेलनेस डान्स अकॅडमीचे डॉ. अजय भन्साळी यांनी संगीताच्या तालावर वार्मअप सेशन घेतले.

पोलीस आयुक्तालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर अशोक स्तंभ, रामवाडी, पेठनाका, शरदचंद्र पवार मार्केट यार्ड सिग्नल, तारावालानगर, दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, शालिमार, द्वारका, काठे गल्ली सिग्नल, मुंबई नाका, गडकरी चौक, सीबीएस, पोलीस परेड ग्राउंड येथे रॅलीचा समारोप झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

World Anti Drug Abuse Day cycle rally
NMC News: ‘आपला दवाखाना’ अडकला लालफितीत; चुंचाळे शिवारात अवघा एक दवाखाना कार्यरत
esakal

शहर गुन्हेशाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी या सायकल रॅलीचे नेतृत्व केले. भीष्मराज सभागहाबाहेर स्टेज उभारून रांगोळीने सजावट, सेल्फी पॉईंट करण्यात आले होते. यावेळी सायकलिस्टच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मीच माझा वैरी’ हे अंमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम दर्शविणारे पथनाट्य सादर केले.

यात डॉ मनिषा रौंदळ, डॉ अजय भन्साळी, साधना दुसाने, माधुरी गडाख, किरण डोंगरे, वैशाली शेलार, सुगंधा व्यवहारे, निलांबरी जगताप, संगीता बडगे यांनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले.

उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अंमली पदार्थाचे सेवन न करण्याची शपथ घेतली. सहाय्यक आयुक्त सिताराम कोल्हे यांनी आभार मानले. सहभागींना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

World Anti Drug Abuse Day cycle rally
NMC Water Shortage Plan: विभागनिहाय प्रत्येकी 3 टँकर; पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com