World Breastfeeding Week : जन्मानंतर एक तासाच्या आत स्‍तनपान बाळासाठी अमृत

World Breastfeeding Week 2022 latest marathi news
World Breastfeeding Week 2022 latest marathi newsesakal

नाशिक : जन्मानंतर लगेचच किमान एक तासाच्या आत स्‍तनपान सुरू केले जाते. त्‍यामुळे बाळाला आईची ऊब व रोगप्रतिकारक प्रथिने मिळतात. सुरवातीचा चीक स्‍वरूपात येणारे दुधातही प्रथिने असतात.

कोणतेही बाळ चीक स्‍वरूपातील दुधात असणाऱ्या प्रथीनांपासून वंचित राहू नये म्‍हणून लगेच तासाभरात स्‍तनपान हे बाळाला द्यावे. यामुळे बाळाचा डायरीया, निमोनिया यासारख्या आजारांपासून बचाव होतो. (World Breastfeeding Week 2022 Breastfeeding within an hour of birth is elixir for babies nashik latest marathi news)

World Breastfeeding Week 2022 latest marathi news
पौरोहित्‍यातही महिलाराज : चांगले करण्यासाठी प्रयत्‍नशील राहण्याची प्रेरणा

नैसर्गिकरीत्या प्रतिकारक्षमता वाढते. ॲलर्जी चे आजार तसेच बालदमा यापासून संरक्षण होते. बाळाचे तापमान सामान्य राखण्यासाठी मदत होते. यामुळे साहजीकच बाळाचे साखरही प्रमाणबद्ध राहते. या सर्वांचा परिणाम बाळाची नैसर्गिक वाढ व्यवस्थित होते.

स्‍तनपानामुळे आईचे व बाळाचे शारीरिक व मानसिक आरोग्‍य छान राहते. स्‍तनपानाने भावनांचा विकास होतो. आईचे व बाळाचे नाते घट्ट होते. हे आईच्या व बाळाच्या आयुष्‍यासाठी कवचकुंडलासारखे काम करते.

स्‍तनपान जसे बाळासाठी गरजेचे आहे, त्‍याचप्रमाणे ते मातेसाठीही खूप महत्त्वाचे आहे. मातेचे वजन नियंत्रणात राहते कर्करोगापासून बचाव, हार्मोनल इनबॅलन्स, दोन मुलांमधील अंतर यासाठी उपयुक्‍त ठरते.

"प्रत्‍येक आईही बाळाला एक तासाच्या आत स्‍तनपान देण्यासाठी आग्रही असली पाहिजे. आईच्या व बाळाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. बाळाचे संरक्षण व निरोगी आयुष्‍य यात स्‍तनपानाचा खूप मोलाचा वाटा आहे." - स्‍नेहा वाघ, बालरोगतज्ञ, जिजामाता हॉस्पिटल

World Breastfeeding Week 2022 latest marathi news
Nashik : चला गं... मंगळागौरीचा करूयात जागर !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com