
नाशिक : स्तनपान करणाऱ्या मातेने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुधाच्या योग्य प्रमाणासाठी मातेने आनंदी व समाधानी राहावे. मातेच्या दुधावर परिणाम करणारे चांगले वाईट घटक याची जाण मातेला असणे आवश्यक आहे.
मातेला ५०० कॅलरी अधिक लागतात. मातेने आहार योग्य व किमान पाच वेळा घ्यावा. बाळ जसे वाढीस लागते तशी त्याची भूकही वाढत जाते. सहा महिन्यापर्यंत बाळ निव्वळ दुधावर अवलंबून असते, अशात मातेचे दूधही योग्य प्रमाणात राहावे यासाठी मातेने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. (World Breastfeeding Week 2022 Mothers should be happy satisfied nashik Latest marathi news)
बाळाशी भावनिक भावबंध, जवळीक, आत्मविश्वास, प्रथिनयुक्त व पौष्टिक आहार यामुळे ग्रंथीमधून योग्य प्रमाणात स्त्राव या साऱ्याचा दुधावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे दुधाचे प्रमाणही योग्य राहते.
मातेने काळजी तसेच शारीरिक व मानसिक ताण घेवू नये. तसेच सहा महिन्यापर्यंत बाळाला बाहेरील दूध किंवा आहार देणे, आत्मविश्वास, नैराश्य, स्तनपानातील अडचणी यामुळे दुधावर परिणाम होतो. स्तनपानातील अडचणींवर डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घेऊन उपाययोजना करावी.
"बाळाच्या योग्य वाढीसाठी मातेने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात प्रथिने व पौष्टिक द्रव्ये यांचा सामावेश करावा. बाळाशी जवळीक साधत मातेने सतत प्रसन्न राहावे."
- प्रसन्न वाघ, बालरोगतज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.