Nashik News | शंभूच्या उपासनाने जगण्याला नवा आयाम: व्यसनाधीनता हद्दपार; मांसाहारावर मारलीय फुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Praveen Jadhav and others doing Mukteshwari Laghurudra

Nashik News | शंभूच्या उपासनाने जगण्याला नवा आयाम: व्यसनाधीनता हद्दपार; मांसाहारावर मारलीय फुली

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केदारनाथांच्या दर्शनाने प्रवीण जाधव वळालेत शंभू उपासनेकडे. त्यातून जगण्याला आयाम मिळाला. व्यसनाधीनता हद्दपार झाली असून, मांसाहारावर फुली मारली. जीवनातील खरा आनंद आणि जगण्याला मिळालेल्या सकारात्मतेविषयीचा भाव श्री. जाधव यांच्या संवादातून उलगडत गेला. (Worship of Shambhu brings new dimension to living banishes addiction skipped meat Nashik News)

खासगी व्यवस्थापनात व्यवस्थापक म्हणून श्री. जाधव कार्यरत आहेत. जीवन म्हणजे, मौज-मजा, मस्ती, अशी त्यांची जीवनयात्रा राहिली. कुटुंबासह आई-वडिलांसाठी वेळ दिला नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये मित्रांसमवेत श्री. जाधव हे लडाखमध्ये फिरायला गेले होते. उंचावरील कमी ऑक्सिजनचा त्रास काही मित्रांना जाणवू लागला.

केदारनाथला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. छानसे दर्शन झाल्यावर घरी परतल्‍यावर श्रावणातल्‍या पहिल्या‍च सोमवारी मित्रांसमवेत ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. त्यातून भोलेनाथवरील श्रद्धा, विश्‍वास दृढ होत गेल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. भोलेनाथवरील श्रद्धेतून व्यसनाधीनता आणि मांसाहार त्यांनी सोडून दिला.

वीस वर्षांच्या संसारात कुटुंबाला राहायला घर नव्हते. जगण्यातील सकारात्मकतेतून सहा महिन्यांत स्वतःचे घर, चारचाकी झाली. संघर्षमय जीवनातील बदलामुळे कुटुंब समाधान, आनंद अनुभवत आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nashik News: तक्रारी, चौकशीने जिल्हा बॅंक प्रशासक नाराज? कामकाजाचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः।

मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः।।

श्रीमद् भगवदगीतामधील हा श्‍लोक आहे. अर्थात, दृढनिश्‍चयी, आत्‍मसंयमी नेहमी आनंदी असा योगी, ज्याने आपले मन आणि बुद्धी माझ्यासाठी समर्पित केली आहे, तो मला प्रिय आहे.

"पतीमधील अविश्वसनीय बदल हा भोलेबाबांच्या कृपेने झाला आहे. पतींवरचे सर्व संकट टळले व पर्यायाने आमच्यावरचे. कधी स्‍वप्नात वाटले नाही, ते प्रत्‍यक्षात अनुभवत आहे. तसेच भोलेबाबाच्या भक्‍तल तल्‍लीन झालेले पती पाहून ‘अशक्‍यही शक्‍य करतील स्‍वामी’ याची प्रचीती आली." -पूजा जाधव, पत्नी

"बाबांचे आजचे रूप बघायला मिळेल, असा विश्‍वास नव्हता. त्‍यांच्या प्रोत्‍साहनाने रोज महादेवाचे दर्शन घेते. बाबा हे माझे श्रद्धा व निर्णयक्षमता यासाठी प्रेरणास्‍थान आहेत."

- साक्षी जाधव, मुलगी

"स्वतःच्या मौजमधील जगण्यात कुटुंब, मुलीचा विचार केला नाही. आता मात्र कुटुंबासोबतचा आनंद आणि मजा अनुभवतो आहे. आनंद किती उच्चकोटीचा असतो, हे अनुभवतो आहे. पत्नीने साथ दिली."- प्रवीण जाधव

"प्रवीण हा आमचा मित्र. त्‍याच्यात झालेला बदल मनाला इतका भावला आहे, की मी ठरवले केदारनाथला जाऊन भोलेबाबांचे दर्शन घ्‍यावे." -उत्‍कर्ष बागूल, मित्र

हेही वाचा: Nashik News : ZPसमोर दीड महिन्यात तब्बल 190 कोटी खर्चाचे आवाहन!