महागाईची बसतेय झळ!...पहिलवान कुस्तीच्या आखाड्याबाहेर...

KUSTI.jpg
KUSTI.jpg

नाशिक : (येसगाव) सद्यःस्थितीत अनेक गावांमध्ये यात्रा, सणाच्या पार्श्‍वभूमीवर कुस्त्यांची दंगल भरविली जात आहे. यासाठी बोटावर मोजण्याइतके गावे सोडली, तर इतर गावांमध्ये बहुसंख्य मल्ल बाहेरून कुस्तीसाठी आलेले असतात. कुस्त्यांची देन (कुस्त्यावर लावलेले बक्षीस) बाहेरच जाते. त्या गावाचा पहिलवान असला, तरी तो कुस्तीत पहिला येण्याची शक्‍यता कमी असते. पहिलवानांसाठी लागणारा खुराक महागाईने वाढला आहे. 

वयानुसार कमीत कमी पहिलवानच्या खुराकवर 25 ते 30 हजार खर्च

सामान्य परिस्थितीतील पहिलवानांना तो परवडत नाही. गुणवत्ता असूनही केवळ पुरेसा खुराक मिळत नसल्याने अनेक पहिलवानांना आखाड्याबाहेरच राहावे लागत आहे. पूर्वी तालीमच्या आखाड्यात पहिलवान दंड, मांड्या ठोकण्याचा आवाज घुमायचा. रिंगणात या आवाजाने प्रेक्षक थक्क होत. आता तो आवाज गायब झाला. जिद्द व आर्थिक परिस्थितीबरोबरच एकत्र कुटुंबातील मुलांना ही संधी असते. त्याला खुराक महत्त्वाचा असतो. वयानुसार कमीत कमी पहिलवानच्या खुराकवर 25 ते 30 हजार खर्च करावे लागतात. त्यात दूध, तूप (गावरान), बदाम, मटण, अंडी, प्रोटीनचा समावेश होतो. पहिलवान होण्याची इच्छा असूनही अनेकांना आर्थिक भार पेलवत नाही. आखाड्यात उतरण्यापूर्वी महागाईच्या पहिलवानला धोबीपछाड केले पाहिजे. पूर्वी ग्रामीण भागात आखाडे होते. शासकीय निधीतून खेडोपाडी व्यायामशाळा बांधल्या आहेत.

एखादा अपवाद सोडल्यास एकही पहिलवान आजपर्यंत तयार झाला नाही. पूर्वी एकत्र कुटुंबातून एखादा पहिलवान व्हावा म्हणून त्याला आखाड्याच्या ठिकाणी पाठवत असे. ग्रामीण भागात त्या काळी दूध, गावरान तूप, कोंबड्या, अंडी उपलब्ध होत असतं. रोज 500 ग्रॅम मटणची बंदी लावली जात असे. सध्या एकत्र कुटुंबपद्धती कमी झाल्या आहेत. 

पहिलवानाला रोजचा अपेक्षित खुराक 

दूध- दोन लिटर, बदाम- 350 ग्रॅम, महिन्याला गावरान तूप- दहा किलो, रोज मटण 400 ते 500 ग्रॅम अपेक्षित आहे. हा खर्च महिन्याकाठी 20 हजारांवर जातो. त्यात आजच्या पिढीची कठोर मेहनत करून पहिलवान होण्याची तयारी दिसत नाही. परिणामी, ग्रामीण भागात गुणवत्ता असूनही महागाई व तरुणांच्या उदासीनतेमुळे पहिलवान व नामवंत कुस्तीगीर कमी होत आहेत. 

सध्या एकत्र कुटुंब राहिलेले नाही. महागाई वाढली. प्रत्येकाला रोजी-रोटीसाठी दिवसभर बाहेर पडावे लागते. त्या काळी एकाने कमविले, तरी पूर्ण कुटुंब आरामशीर खात होते. आजच्या महागाईत सर्वच कमावतील तेव्हा कुटुंब चालते. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून मिळेल त्या वेळेत कसरत करून पहिलवान होण्याबरोबरच शरीरसंपदा कमवावी. 
- अर्जुन बच्छाव, पहिलवान, जुनी शेमळी  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com