पान-४ सेकंड मेन
(कृपया आवश्यक/कॉमनला घ्यावी... 16 पाव पेज जाहिरातींचे पॅकेज आहे..)
फोटो ओळी-27528
कोपरगाव : यश नन्नावरे याचा पालकांसह सत्कार करताना संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे. शेजारी डाॅ. कापगते, डाॅ. जावळे व डाॅ. गवळी.
‘संजीवनी’च्या यश नन्नावरेची तैवानमध्ये इंटर्नशीपसाठी निवड
संपूर्ण खर्च विद्यापीठच उचलणार; इंटर्नशिपला जाणारा यश ७६ वा विद्यार्थी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी यश संजय नन्नावरे याची तैवानमधील दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली असून, तो तैवानला रवाना झाला आहे.
या कालावधीत तो डॉ. सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॉर मेडिकल डिव्हाइस’ या विषयावर संशोधन कार्य करणार आहे. यशच्या प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च दायेह विद्यापीठच करणार आहे. तैवानला इंटर्नशिपला जाणारा यश हा ७६ वा विद्यार्थी आहे.
यशला मिळालेल्या संधीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी त्याचे व पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते यश आणि त्याचे वडील संजय नन्नावरे, आई उज्ज्वला नन्नावरे यांचा सत्कार झाला. डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स डॉ. महेंद्र गवळी, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.
‘संजीवनी’च्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागामार्फत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिप आणि संशोधनाच्या संधी मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. यापूर्वीही विद्यार्थ्यांना रशिया, तैवान, कॅनडा, फिलिपाइन्स, ट्युनिशिया, युनायटेड किंगडम इत्यादी ठिकाणच्या नामांकित विद्यापीठांत इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. या वेळी यशने माझ्या यशात आई-वडील आणि संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
...............
कोट
‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळणे ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धतीची पावती आहे. ‘संजीवनी’त विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही जगातील नामांकित विद्यापीठांशी सहकार्य वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
-अमित कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी विद्यापीठ