‘यशस्विनी’ची उत्पादने आता Reliance Mallमध्ये; 'सुगरण'द्वारे महिला बचतगटांना मिळाली हक्काची बाजारपेठ

Officials of Yashwantrao Chavan Center and Reliance Smart Super Store at the launch of 'Sugaran' activity.
Officials of Yashwantrao Chavan Center and Reliance Smart Super Store at the launch of 'Sugaran' activity.esakal

नाशिक : यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी प्रकल्प आणि रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर यांच्यातर्फे महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुगरण’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे यशस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी निर्माण केलेली उत्पादने आता रिलायन्स मॉलमध्ये उपलब्ध होणार आहेत. (Yashaswini products now in Reliance Mall Through Sugaran activity mahila bachat gat got their rightful market nashik news )

यशवंतराव सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, सदस्य ॲड. नितीन ठाकरे, यशस्विनी उपक्रमाच्या समन्वयक सुनीता निमसे, संगीता सुराणा, पुष्पा राठोड, राजश्री कदम, सपना पगार आदी या वेळी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी राज्यातील रिलायन्स सुपर स्टोअरमध्ये दर शनिवारी व रविवारी स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. या वेळी ‘यशस्विनी’ च्या कार्याध्यक्ष खासदार सुळे म्हणाल्या, रिलायन्स उद्योग समूहाने महिला बचतगटांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Officials of Yashwantrao Chavan Center and Reliance Smart Super Store at the launch of 'Sugaran' activity.
Digital युगात लोककलांना ऊर्जितावस्था! तरुण पिढी सक्रिय झाल्याने Social Mediaवर सर्वाधिक चर्चा!

बचतगटाच्या महिलांकडे कल्पना आहेत. उत्पादन आहे. पण, त्या मार्केटिंगमध्ये कमी पडत होत्या. आता रिलायन्समुळे त्यांना ते उपलब्ध झाले. ग्राहकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरवातीच्या टप्प्यात फक्त पाच बचतगटांना संधी देण्यात आली. त्यामध्ये हळूहळू वाढ करण्यात येणार आहे.

रिलायन्सने एक संधी दिली असली, तरीही आगामी काळात स्वतः रिलायन्स बचतगटांकडे तुमचे उत्पादन मागेल, अशी उत्पादने तयार करण्याचे आव्हान बचतगटांसमोर आहे, असेही त्या म्हणाल्या. देवयानी मदाने, सीमा भुसावळ, अनिता दामले, गीता गायकवाड, शुभांगी बैरागी, संगीता हिंगे, सुरेखा बोराडे, चित्रा काळे आदी या वेळी उपस्थित होत्या.

Officials of Yashwantrao Chavan Center and Reliance Smart Super Store at the launch of 'Sugaran' activity.
Graduate Constituency Elections : सत्यजित तांबे यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात; 6 जणांची माघार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com