Nashik News : माणसात देव पाहणारे देवमामलेदार यशवंत महाराज

एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देवत्व प्राप्त होणे ही संगणक युगात नवल वाटणारी गोष्ट आहे.
Yashwant Maharaj who sees God in man article by ambadas deore nashik news
Yashwant Maharaj who sees God in man article by ambadas deore nashik newsesakal

Nashik News : एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देवत्व प्राप्त होणे ही संगणक युगात नवल वाटणारी गोष्ट आहे. मात्र १९ व्या शतकात भीषण दुष्काळात बागलाणवासीयांना ज्यांनी जगविले, शासकीय खजिना जनतेसाठी रिता केला, त्यांना जनतेने देवमामलेदार म्हटले. त्यांचे मंदिर बांधले. त्यांच्या नावाने मार्गशीर्ष वद्य एकादशीला मोठ्या उत्साहात पुण्यतिथी सोहळा होतो. रविवारी आज (ता.७) पहाटे चारला महापूजा व अभिषेक होत आहे. त्यानिमित्ताने.- अंबादास देवरे, सटाणा (Yashwant Maharaj who sees God in man article by ambadas deore nashik news)

भारतात अनेक संत, देव, युगपुरुषांची मंदिरे आहेत, मात्र सटाणा शहर त्याला अपवाद असून येथील जनता एका सरकारी अधिकाऱ्याची पूजा करते. मामलेदार या सर्वोच्च पदावर असूनही आपल्या अंगी असलेल्या मानवता, प्रेम, विनम्रता या गुणांच्या बळावर देवपदापर्यंत पोहोचलेले देवमामलेदार यशवंतराव महाराज सर्वांचे प्रेरणास्थान बनले आहे. १३ सप्टेंबर १८१५ ला करकमभोसे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे श्री यशंवतराव महाराजांचा जन्म झाला.

शिक्षण व लग्नानंतर येवला येथे कारकून पदावर त्यांना नोकरी लागली. यशवंतराव महाराज हे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले, तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांना भविष्यात तुझ्या हातून असे काही कार्य घडणार आहे, की भूतलावरील सर्व लोक तुलाच देव म्हणतील, असा आशीर्वाद दिला. स्वामींच्या आशीर्वादानं तर महाराजांचे जीवनच बदलून गेले.

नोकरीत बढती होत गेली. कारकून, खजिनदार, शिरस्तेदार, दप्तरदार ते थेट मामलेदारपदापर्यंत महाराजांची धर्मध्वजा फडकतच गेली. मामलेदार असून देखील राहणीमान अगदी साधी होती. डोक्यावर लाल पगडी व कमरेला धोतर असा त्यांचा भारतीय पेहराव. लहान, मोठे, गरीब-श्रीमंत सर्वांशीच महाराज नम्रतेनेच वागले. त्यांना मिळणारा सर्व पगार, ते गोरगरिबांसाठी व अन्नदानासाठी खर्च करीत.

पत्नी सुंदराबाई (रुक्मिणीमाता) देखील त्यांच्याच योग्यतेच्या. सटाणा येथे बदलून आल्यानंतर ८ मे १८६९ ला ब्रिटीशकाळात सटाणा येथे स्वतंत्र मामलेदार कचेरी स्थापन झाली. बागलाण तालुक्याचे पहिले मामलेदार म्हणून यशवंतराव महाराज हे सटाण्यात रुजू झाले. महाराज सटाण्यात नोकरीनिमित्त केवळ चारच वर्ष वास्तव्यास होते. मात्र, अवघ्या चार वर्षांच्या काळात असे काही कार्य व चमत्कार त्यांच्या हातून घडले, की सटाणा हे गाव देवमामलेदारांची पुण्यनगरी म्हणून नावारूपास आली.

Yashwant Maharaj who sees God in man article by ambadas deore nashik news
Nashik News : सोयगावातील जमिनींना सोन्याचा भाव; हद्दवाढीमुळे विकासाला नवे पंख

श्री महालक्ष्मी मातेने आपल्या अस्तित्वाविषयी त्यांना दृष्टांत देत मुल्हेर येथील तलावात मूर्ती असल्याचे सांगितले. दुसऱ्याच दिवशी महाराजांनी येथून श्री महालक्ष्मी माता आणि श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आणून सटाणा येथे आरमतिरी मंदिरात प्रतिष्ठापना केली. बागलाणमध्ये धरणे बांधून हजारो एकर शेती ओलिताखाली आणली. गरजू लोकांना रोजगार मिळवून दिला. सरकारी योजनांचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविला. १८७०- ७१ मध्ये बागलाणवासियांना भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले.

जनतेचे हाल व उपासमार पाहून महाराजांचे व त्यांच्या धर्मपत्नी रुक्मिणीबाईंचे मन उद्विग्न झाले. एके दिवशी महाराजांनी सकाळी नित्यनियमाची देवपूजा जरा लवकर आटोपली व त्यानंतर तडक आपल्या कचेरीत येऊन सरकारी खजिना उघडला. महाराजांनी अंगावरील उपरण्यात जेवढे पैसे घेता येतील तेवढे घेतले आणि कचेरीबाहेर येऊन रस्त्याने जो गोरगरीब दिसेल त्याला पैसे वाटण्याचा सपाटा चालविला.

बघता बघता महाराजांनी सरकारी खजिन्यातील १ लाख २७ हजार रुपये व सर्व धान्य दुष्काळात होरपळणाऱ्या गोरगरीब जनतेमध्ये वाटून दिले. खजिन्यात आता एकही पैसा शिल्लक नव्हता, तरीही लोकांची गर्दी काही कमी होत नव्हती. महाराज तडक घरी गेले. घरात होते नव्हते तेवढ्या सोने-चांदीचे दागिने, भांडी, रोकड, कपडे हे सर्व जनतेमध्ये वाटून दिले आणि देवापुढे ध्यानस्थ बसले.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ही बातमी समजताच त्यांनी प्रांतांना घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. चौकशीसाठी प्रांत कचेरीत येताच त्यांनी पाहिले तर पैसा, धान्य जसेच्या तसे होते. ही बातमी महाराजांच्या कानावर आली. त्यांनी कुलदैवत श्री नरसिंहास नमस्कार केला आणि कचेरी गाठली. या अद्भुत चमत्कारामुळे सर्व जनता महाराजांना देवमामलेदार म्हणू संबोधू लागली.

Yashwant Maharaj who sees God in man article by ambadas deore nashik news
Nashik News : थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा; आठवडेबाजारावर परिणाम

बागलाणच्या मातीत त्यांच्या जीवनात चमत्कारांचे अनेक प्रसंग घडले. लोकांना त्यांच्या दैवीशक्तीचा अनुभव येऊ लागला. त्यामुळे लोक त्यांना देव मानू लागले. त्यांची ही अलौकीक कीर्ती ऐकून सटाण्यासारख्या खेड्यागावात दूरवरून लोक या चालत्या बोलत्या देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागले. अनेक साधूसंतानी देखील यशवंतराव महाराजाकडूनच अनुग्रह घेऊन आपले संपूर्ण जीवन जगाच्या कल्याणासाठी अर्पित केले.

असे हे दिव्य महात्मा वयाची ७२ वर्ष पूर्ण करून ११ डिसेंबर १८८७ मार्गशीर्ष वद्य एकादशी यादिवशी अंतर्धान पावले. नाशिक येथील गोदाघाटावर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. देवमामलेदारांच्या मृत्यूनंतर जनतेने सटाणा येथे त्यांचे मंदिर बांधण्याचे ठरविले. १८८८ म्हणजेच महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथीपर्यंत मंदिराचे बांधकाम सुरु झाले होते.

काही वर्षात आरम नदीकिनारी महाराजांचे मंदिर उभे राहिले. सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी १९०० मध्ये पहिला यात्रोत्सव सुरू झाला. त्यानंतर दरवर्षी मार्गशीर्ष वद्य एकादशीला त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून रथ मिरवणुकीने सुरवात होऊन यात्रोत्सव सुरू होतो. ही यात्रा सलग १५ दिवस चालते. यात्रोत्सवास भाविकांची मोठी गर्दी उसळते.

Yashwant Maharaj who sees God in man article by ambadas deore nashik news
Nashik News : जिल्ह्यात ग्लेनमार्क ची शेकडो कोटीची गुंतवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com