श्रमदानातून बांधले वनराई बंधारे

श्रमदानातून बांधले वनराई बंधारे
Published on: 
पान दोन ----------- 33965 घनशेतः यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या पुढाकारातून बांधलेल्‍या वनराई बंधाऱ्याच्या स्‍थळी ग्रामस्‍थांसह उपस्‍थित मान्‍यवर. --- श्रमदानातून बांधले वनराई बंधारे मुक्त विद्यापीठाचा दुष्काळग्रस्तांसाठी सामाजिक उपक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३०: दुष्काळी भागात श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाने हाती घेतला आहे. याअंतर्गत विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या पेठ तालुक्यातील घनशेत व पळशी (गावंध) येथील वाहत्या नाल्यांवर प्रत्येकी दोन असे एकूण चार वनराई बंधारे बांधले आहेत. उन्नत भारत अभियानांतर्गत विद्यापीठातील ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखा आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे विद्यार्थी स्वयंसेवक, स्थानिक ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, कृषी विभाग व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. या बंधाऱ्यांना ‘यशवंत वनराई बंधारा’ असे नाव दिले आहे. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते या यशवंत वनराई बंधाऱ्याचे उद्‌घाटन झाले. पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, पळशी (गावंध) चे सरपंच धनराज ठाकरे, घनशेतच्या सरपंच शांता चौधरी, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी ओंकार गावित, ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे उपस्‍थित होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नंदू गायकवाड, सुरेश पखाने, विनायक महाले, कैलास चौधरी, मीराबाई गावित आदी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यापीठ ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे शैक्षणिक संयोजक डॉ. दीपक सोनवणे, गोकूळ टोंगारे आणि गणेश उमाळे यांनी विशेष सहकार्य केले. उपक्रमाविषयी कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे म्‍हणाले, की येत्या काळात शेती, पिण्यासाठी व जनावरांसाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे संधारण, साठवण, नियोजन सध्याची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.