YCMOU Convocation : मुक्‍तचा दीक्षांत समारंभ 23 फेब्रुवारीला

YCMOU convocation ceremony
YCMOU convocation ceremony esakal

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचा अठ्ठाविसावा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला होणार आहे. या समारंभात हिवाळी सत्र २०२१ आणि उन्‍हाळी सत्र २०२२ या परीक्षांतील उत्तीर्ण उमेदवारांना पदवी प्रदान केली जाणार आहे. (YCMOU convocation ceremony on 23rd February nashik news)

दीक्षांत समारंभाबाबत यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी सूचना जारी केलेली आहे. त्‍यानुसार पात्र स्‍नातकांना पदवी व पदविका प्रदान करण्यासाठी मुक्‍त विद्यापीठाचा अठ्ठाविसावा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता विद्यापीठ प्रांगणात आयोजित केलेला आहे.

या दीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर केले जाणार आहे. या अठ्ठाविसाव्‍या दीक्षांत समारंभासाठी हिवाळी २०२१ आणि उन्‍हाळी २०२२ या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्‍या पात्र स्‍नातकांना कार्यक्रमात पदवी, पदविका प्रदान केली जाणार आहे.

दीक्षांत समारंभाच्‍या दिवशी उपस्‍थित राहून पदवी, पदविका ग्रहण करणाऱ्या स्‍नातकांना त्‍यांच्‍या पदवी, पदविका प्रमाणपत्राचा क्रमांकाच्‍या साहाय्याने पदवी, पदविका प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

YCMOU convocation ceremony
Nashik News : Parking Slot सुरू करण्यास MNCला नकार

तसेच उर्वरित अनुपस्‍थित स्‍नातकांना, कालांतराने त्‍यांनी पदवी प्रमाणपत्र अर्जावर, आवेदन पत्रावर नमूद केलेल्‍या पत्त्यावर अथवा त्‍यांच्‍या अभ्यासकेंद्रावर जलद टपालाने पदवी, पदविका प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे.

राज्‍यभरातून स्‍नातक होतील सहभागी

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचा राज्‍यस्‍तरावर विस्‍तार आहे. त्यामुळे पदवी, पदविका पूर्ण करणारे राज्‍यभरातील उमेदवार या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. विशेषतः विविध शिक्षणक्रमांमध्ये भरीव कामगिरी करत सुवर्णपदक विजेते विद्यार्थ्यांना या समारंभात पदक प्रदान केले जातील.

YCMOU convocation ceremony
Nashik Fire Accident : सिन्नरमधील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील साईटेक फार्मा कंपनीस शॉर्ट सर्किटमुळे आग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com