YCMOU News : मुक्त विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘ई-सुविधा’; प्‍लेस्‍टोअरवर App उपलब्‍ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YCMOU Latest marathi news

YCMOU News : मुक्त विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘ई-सुविधा’; प्‍लेस्‍टोअरवर App उपलब्‍ध

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे राज्‍यस्‍तरावर शिक्षणाची ज्ञानगंगा पोचविण्याचे काम केले जात आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ‘वायसीएमओयू ई- सुविधा’ हे मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्‍ध केले आहे.

सध्या हे ॲप प्‍लेस्‍टोअरवर (अँड्रॉइड) उपलब्‍ध आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्‍या विविध सुविधांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. (YCMOU News Efacility for Open University students App available on playstore nashik news)

दूरस्‍थ शिक्षणाची संधी उपलब्‍ध करताना मुक्‍त विद्यापीठाचा राज्‍यस्‍तरावर विस्‍तार झाला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदविका, पदवी, पदव्‍युत्तर शिक्षणाची संधी विद्यापीठामार्फत उपलब्‍ध झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विद्यापीठात विविध शिक्षणक्रमांना एकूण चार लाख ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. राज्‍यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. कार्यालयीन प्रणालीचा भाग म्‍हणून विभागीय कार्यालयांशी हे विद्यार्थी संलग्‍न असतात.

परंतु, दरवेळी विद्यापीठ किंवा विद्यापीठाच्‍या विभागीय कार्यालयांमध्ये जाणे वेळखाऊ व खर्चिक होते. अशावेळी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्‍या सुविधांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने विद्यापीठामार्फत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. याअंतर्गत विद्यापीठाने ‘वायसीएमओयू ई- सुविधा’ ॲप प्लेस्‍टोअरवर उपलब्‍ध केले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: नाशिकचे Startup Revamp Motoला राष्ट्रीय पुरस्‍कार! रोख पारितोषिकांसह व्‍यवसाय विस्‍तारासाठी मिळणार संधी

दहा हजारांहून अधिक वापरकर्ते

गुगल प्‍लेस्‍टोअरवर उपलब्‍ध असलेले हे ॲप्लिकेशन ५.५७ एमबीचे आहे. सध्या राज्‍यात साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला असला तरी या ॲपच्‍या वापरकर्त्यांची संख्या सुमारे दहा हजारांहून जास्त आहे.

विद्यार्थ्यांशी निगडित सुविधांचा लाभ घेण्यासाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून वापरावे, असे आवाहन मुक्‍त विद्यापीठाने केले आहे.

ॲपमध्ये उपलब्‍ध सुविधा

- ॲपद्वारे प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्‍ध

- प्रवेशित विद्यार्थ्यांना, प्रवेशानंतरच्‍या सेवांसाठी पर्याय

- कॅलेंडरच्‍या माध्यमातून वर्षभरातील नियोजनाची माहिती अवगत

- प्रश्‍नपत्रिका डाउनलोड करणे, आपली प्रोफाइल पाहण्याची सुविधा

- पेपरची माहिती मिळविण्यासह उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी बघणे सुलभ.

- परीक्षेचे वेळापत्रक प्राप्त करून घेण्याचा पर्याय

- ट्रान्‍सस्‍क्रीप्‍ट सर्टिफिकेशनसाठी अर्ज करण्याची संधी

हेही वाचा: Nivruttinath Yatrotsav : भजन, कीर्तन अन् भारुडात रंगले वारकरी! कडाक्याच्या थंडीतही भक्तिभावाने सहभागी

टॅग्स :NashikApplicationYCMOU