YCMOU News: राज्यपालांच्या दौऱ्यामुळे मुक्त विद्यापीठ रस्त्याची मलमपट्टी! दौऱ्यामुळे तात्पुरता दिलासा

YCMOU university road paved due to Governors visit
YCMOU university road paved due to Governors visitesakal

YCMOU News : गंगापूर रोडवरील मुख्य रस्‍त्‍यापासून यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठापर्यंत जाणाऱ्या रस्‍त्‍याची चाळण झालेली असताना गुरुवारी (ता. १२) माती टाकून मलमपट्टी करण्यात आली आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना रस्त्यावर माती टाकल्याने दिलासा मिळाला आहे. (YCMOU university road paved due to Governors visit Temporary relief from travel nashik)

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांचे दुपारी एकला विद्यापीठात आगमन झाले. जिल्हा आढावा बैठक व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कामकाजाचा त्यांनी या वेळी आढावा घेतला.

विद्यापीठ रस्‍त्‍याची दुरवस्‍था पाहता वाहन चालविणे तर दूरच रस्‍त्‍यावर चालणेदेखील मुश्‍कील बनले असल्‍याची स्‍थिती होती.

नाशिक शहरातून गंगापूर रोडवरील मुक्‍त विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याच्‍या फाट्यापर्यंत जाण्यास जितका वेळ लागतो, त्‍यापेक्षाही अधिक वेळ फाट्यापासून मुक्‍त विद्यापीठापर्यंत पोचण्यासाठी लागत होता.

YCMOU university road paved due to Governors visit
YCMOU News : ‘मुक्‍त’ होणार ‘हनी बी व्‍हिलेज’! मधमाश्‍यांचे गाव म्‍हणून 100 खेड्यांचा पुढील टप्प्‍यात विकास

राज्यपालांचा दौरा असल्यामुळे राजकीय उदासीनता व अन्‍य तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्‍या रस्‍त्‍यावरील खड्डे मातीने बुजविण्यात आले. राज्यपालांच्या दौऱ्याच्या एक तास आधीपर्यंत हे काम सुरूच होते.

गंगापूर फाटा ते विद्यापीठ संपूर्ण रस्त्यावर माती टाकण्यात आली. सपाटीकरणासाठी रोडरोलर फिरविण्यात आले.

धूळ उडू नये यासाठी मजूर पाण्याचा मारा करताना दिसले. माती टाकल्यामुळे कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, स्थानिकांचा हा वेळ राज्यपालांच्या दौऱ्यानंतर वाचणार आहे.

YCMOU university road paved due to Governors visit
YCMOU News : ‘मुक्त’च्या गुणपत्रिकेच्या पॅटर्न पोचणार राज्यभर; राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विविध सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com