येवला- राज्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी शासनाकडून आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा वापरली जात आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ‘एआय’ यंत्रणा विकसित करावी. त्यातून शेतकऱ्यांना वेळेवर आवश्यक ती माहिती उपलब्ध होईल. त्यातून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.