येवला- अवघ्या ३५-४० घरांची कॉलनी.. पालिकेच्या दोन मोकळ्या जागा असल्याने या ठिकाणी सुंदर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधण्याची संकल्पना पुढे आली आणि सर्वात देखणे मंदिर अवघ्या वर्षभरात साकारले. असे म्हणतात की मनात एखादी प्रबळ इच्छा आणली, की ती पूर्णत्वास जाते, याची प्रचिती बाजीराव नगरातील नागरिकांना आली आहे. शहरातील अनेक दानशूरांनीही या मंदिराच्या उभारणीला हातभार लावला आहे.