देवदर्शनाला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले..! येवल्यात १३ लाखांचा मोठी घरफोडी; २३ तोळे सोने,रोख चार लाख अन घरातील दुचाकीही चोरली

देवदर्शनाला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले..! येवल्यात १३ लाखांचा मोठी घरफोडी; २३ तोळे सोने,रोख चार लाख अन घरातील दुचाकीही चोरली
Published on: 
फोटो- 27533, 27534 येवला : कासार गल्लीतील केवारे यांच्या मध्यवस्तीत घरी झालेली चोरी, स्कूटी चोरून नेताना कॅमेऱ्यात कैद झालेला चोरटा. येवल्यात १३ लाखांची मोठी घरफोडी २३ तोळे सोने, चार लाखांची रोकड अन् घरातील दुचाकीही लांबविली सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १५ : कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले अन चोरट्यांनी घर साफ केले...! असा प्रकार शहरातील मध्य वस्तीतील कासार गल्ली परिसरात घडला. चोरट्यांनी निवृत्त मंडळ अधिकारी पुष्कराज केवारे यांचे घर फोडून तब्बल १२ लाख ९९ हजारांचा ऐवज लंपास केला. घरातील तब्बल २३ तोळे सोन्याचे दागिने, चार लाखांची रोकड, नवीन ॲक्टिव्हा दुचाकी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही चोरट्यांनी पळविल्याने शहरात खळबळ उडाली असून, भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्री. केवारे यांचे कुटुंब शुक्रवारी (ता. १३) दुपारी पुणे, जेजुरीला देवदर्शनासाठी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी शनिवारी (ता. १४) मध्यरात्री घराचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश करत घरातील सुमारे २३ तोळे सोन्याचे दागिने, चार लाखांची रोकड, दुचाकी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर असा लाखोंचा मुद्देमाल लांबविला. कुटुंबीय सायंकाळी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहर पोलिसांत श्री. केवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड गोळा केली. एवढ्यावरच न थांबता नवीन ॲक्टिव्हा दुचाकी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही सोबत नेला. चोरीस गेलेल्या ऐवजात दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, सहा ग्रॅमचे कानातील टॉप्स, दोन तोळ्यांचा नेकलेस, पाच तोळ्यांचे सोन्याचे टॉप्स, दहा तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या यांचा समावेश आहे. याशिवाय ५० हजारांची ॲक्टिव्हा चार लाखांची रोकड, चार हजारांचा डीव्हीआर असा एकूण १२ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. दरम्यान, १४ नोव्हेंबरला केवारे कुटुंबीय देवदर्शनावरून घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ......... कोट शहराच्या मध्यवस्तीत छोट्या गल्ल्या असल्याने रात्री पेट्रोलिंग करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरांना कुलपे लावताना शेजारी, नातेवाईक व पोलिसांना माहिती द्यावी. तसेच मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड घरी न ठेवता सुरक्षित जागी ठेवून जावे. - संदीप मंडलिक, शहर पोलिस निरीक्षक, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.