पान-१ मेन
------------------
YEO26B26983, YEO26B26984
दहेगाव पाटोदा : खरिपाच्या नुकसानीचे पंचनामे करताना नेमलेले कर्मचारी
------------------
६०-४
दुष्काळाचे पंचनामे जलदगतीने
--------------
प्रशासनाचे आदेश ः पिकांचे छायाचित्र आणि जीपीएस कोऑर्डिनेट असेल अनिवार्य
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २ : जिल्ह्यात दहा तालुक्यात खरीप हंगामासाठी प्रथम कळ (ट्रीगर) लागू झाल्याने दहा तालुक्यात तातडीने शेती व फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. प्रशासनाने त्यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून हे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
--------------
पिकांचे पंचनामे करताना सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकाची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुढील संस्करण सुलभ व्हावे यासाठी हे संपूर्ण संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल. पंचनामा करताना शेतकऱ्याचा फार्मर आयडी नोंदवून घेतला जाईल आणि तो उपलब्ध नसल्यास आधार क्रमांक संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
--------------
१६-१
हे घटक तपासले जाणार
पंचनामे करताना बाधित गट,क्षेत्र त्यांची टक्केवारी ३३ टक्क्यांपेक्षा कमी आणि जास्त अशा कॉलममध्ये विभागणी करून केली जात आहे. पंचनामे यावर शेतकऱ्याची सही घ्यावी लागत आहे.शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अनिवार्य असून असल्यास आधार क्रमांक घेऊन सर्व याद्या बनवल्या जाणार आहे.
-----------
येवला तालुक्यात १२४ गावांमध्ये ११९ कर्मचारी ८० हजार हेक्टरवरील पंचनामे करणार असून पुढील दोन तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मदतीच्या अनुषंगाने गावोगावी पंचनाम्याला वेग आला आहे. पंचनाम्यांचे काम अत्यंत वेगाने व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तालुक्यातील १२४ गावांमध्ये गावनिहाय पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कामाचे योग्य नियोजन होण्यासाठी तालुक्याची सर्व प्रमुख मंडळांमध्ये विभागणी करून गावांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी काही कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त गावांची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. याबाबतचे संयुक्त आदेश तहसीलदार आबा महाजन,गटविकास अधिकारी संदीप वायाळ, आणि तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी काढले आहेत.
२०-२
येवला तालुक्यात १३३ गावात नुकसान
तालुक्यातील संपूर्ण १३३ गावात नुकसान झाले असल्याने आणि तब्बल ७५ हजार हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे. याशिवाय कांदे लागवड व रोपांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. एकट्या मका पिकाखाली सुमारे ४७ हजार हेक्टर गुंतवले गेले असून सर्वाधिक नुकसान मकाचे झाले आहे. एकाच कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा जास्त गावांची जबाबदारी सोपवली असून मोठ्या गावांना दोन किंवा तीन कर्मचारी नेमलेले असून एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ११९ आहे.यामध्ये तलाठी ४३,ग्रामसेवक ४३ व कृषी सहाय्यक ३३ असे ११९ कर्मचारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन काम करत आहे. पंचनामे बिनचूक होण्यासाठी वरिष्ठ विस्तार अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी व पर्यवेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
---------------
येवला तालुक्यातील स्थिती
पिक - पेरणी हेक्टर
बाजरी - ५५४६
मका - ४७२९०
तूर - ६१९
मूग - ६५२२
भुईमुग - १६०९
सोयाबीन - १३३१७
कापूस - ५७८
कांदे - ३०४५
कांदा रोपे - १५००
-------------------