पान-२ मेन-------५ कॉ करणे
--------
फोटो २ कॉ
YEO26B27099
येवला : विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी युवा नेते कुणाल दराडे,माजी नगरसेवक रिझवान शेख व पदाधिकारी
--------
५० कोटींच्या विकासकामाचे लोकार्पण!
-----------
येवल्यात आमदार दराडे बंधूच्या प्रयत्नांतून रस्ते, कॉंक्रिटीकरण, गटाराच्या कामांना चालना
----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१० : येवला शहरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक सुलभ व्हाव्यात आणि परिसरातील मूलभूत सुविधांचा विकास व्हावा, या उद्देशाने जहागीरदार मळा, जहागीरदार कॉलनी तसेच अशफाक सागर ते अली मशीद बोळ परिसरातील सुमारे ५० कोटींच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते झाला.
माजी आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या विशेष प्रयत्नांतून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या तीन विकासकामांसाठी ४८ लाख ४० हजार ९२५ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या अंतर्गत जहागीरदार मळा ते जहागीरदार कॉलनी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी २४ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. जहागीरदार कॉलनी, सर्वे क्रमांक ३/१ येथे अकिलभाई बॅटरीवाले यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी ११ लाख ८२ हजार रुपये, तर अशफाक सागर ते अली मशीद बोळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ११ लाख ८३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. या तिन्ही विकासकामांसाठी एकूण ४८ लाख ४० हजार ९२५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे कुणाल दराडे यांनी सांगितले.
या कामांचे फलक अनावरण करून मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कामांमुळे परिसरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासह नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न सुकर होण्यास मदत होणार आहे.
लोकार्पणाप्रसंगी दस्तगीरशेठ शेख, रिझवान शेख, मोहफिज अत्तार, अशफाक सागर,अखलाख, वसीम मेंबर, अक्रम घासी, मोबीन शेख, अर्जुन जावळे, मोहम्मद हुसेन सरदार, वसीम मलंग, विशाल परदेशी, हितेन जावळे, तसदीक शेख,श्री. मजीत, अजिज शेख, शकील पटेल, इस्तियाक मुलतानी, सोहेल फारुखी, इब्राहिम सय्यद आदी उपस्थित होते.
---------------
कोट
दोन्ही आमदार बंधूंच्या माध्यमातून शहरात व मतदारसंघात कोट्यवधीची कामे झाली आहेत. शहराच्या विविध नववसाहतीसह वंचित भागाला काँक्रिटीकरण, गटारी करून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. भविष्यातही शहर परिसरात अनेक विकासकामे कामे प्रस्तावित आहेत.
- कुणाल दराडे, युवा नेते, येवला.
--------