पान-३ मेन
YEO26B27235
येवला : दुष्काळग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
-------------------
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख मदत द्या
--------------
संपूर्ण कर्जमाफी द्या ः दुष्काळग्रस्ताच्या मदतीसाठी काँग्रेसचे येवल्यात धरणे आंदोलन
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१९ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी तालुका काँग्रेस समितीतर्फे सोमवारी (ता.१९) येथील तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केलेल्य घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
---------------
तालुका कॉंग्रेसतर्फे मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विवेक चांदवडकर यांना देण्यात आले. ‘‘यंदा पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी दुष्काळात होळपळत आहे. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस अल्पसा पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मका सोयाबीनसह अन्य पिकांची मोठा खर्च करून पेरणी केली. परंतु त्यानंतर पाऊस न आल्यामुळे पिके आलीच नाहीत. मका व सोयाबीन पिकाला नांगरणी, कल्टीवेटर, बियाणे, पेरणी, तणनाशक, आळई औषध, निंदणी, खत, औत फाटा, सोंगणी, मळणी, मार्केट वाहतूक, मजुरी, आडत हमाली यासह मोठा खर्च येतो. शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला परंतु पाऊस न आल्यामुळे कोरडा दुष्काळ पडून शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पिकाच उत्पादन आले नाही. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी’’ असे निवेदनात म्हटले आहे.
-------------
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, राष्ट्र सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनकर दाणे, राजेंद्र पगारे, संजय मिस्त्री, बाबासाहेब शिंदे, विद्याभूषण दुगड, नानासाहेब शिंदे, जयप्रकाश वाघ, समाधान पडवळ, डॉ. दिगंबर गायकवाड, युवक काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. अक्षय शिंदे, रेहान पठाण, संदीप दारुंटे, अशोक मोहारे, आबासाहेब शिंदे, बबनराव मिटके, रोहन दिवे, योगेश जाधव, विवेक चव्हाण, शुभम सोमासे, विनायक वाहुळ, अनिल घोडेराव, बबनराव भोरकडे, संदीप पगारे, गोरख शिंदे, संदीप पगारे, राहुल सोनवणे, दीपक काथवटे, योगेश पोळ, बाळासाहेब आवारे, रामभाऊ आवारे, दशरथ खांडेकर, भाऊसाहेब कापसे आदीसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
-----------------
कोट
शासनाच्या धोरणामुळे शेतमाला अगोदरच योग्य भाव मिळत नसताना आता दुष्काळाचे संकट कोसळले आहे. पेरणीसाठी गुंतवलेले भांडवलही न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शासनाने तत्काळ पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा."
-ॲड. समीर देशमुख, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, येवला.