पान-१--सेकंडमेन
---------
फोटो ४ कॉलम
YEO26B27513
येवला : पालखेडच्या पाण्याचे शेतीसाठी आवर्तन त्वरित मिळावे यासाठी झालेल्या बैठकीला उपस्थित असलेले शेतकरी.
--------------
पालखेडच्या रब्बी आवर्तनासाठी सर्वपक्षीय एल्गार
येवल्यात बैठकीत संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा, पालकमंत्र्यांचे दूरध्वनीवरून आश्वासन
----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१३ : जिल्ह्यातील सर्व धरणात पाणी असूनही रब्बीची पिके पाण्याअभावी हातातून जाण्याची भिती आहे. तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि उभ्या पिकांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न लक्षात घेता पालखेड डाव्या कालव्यातून शेतीसाठी दोन आवर्तने मिळावीत या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली. आवर्तन त्वरीत न सोडल्यास सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
-------------
तालुक्यात सध्या पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती असून उभी पिके वाचविण्यासाठी तातडीने पाण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्यातून शेतीसाठी दोन आवर्तने सोडण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांतर्फे बाजार समितीत सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी बैठकीतूनच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून थेट उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद घडवून आणला.
१४-१
तर पिकांची राखरांगोळी होणार
मंत्री महाजन यांनी १० डिसेंबरला आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली, मात्र शेतकरी संघटनेचे नेते संतु पा. झांबरे यांनी इतक्या उशिरा पाणी मिळाल्यास पिकांची राखरांगोळी होईल, त्यामुळे लवकर आवर्तन द्यावे अशी मागणी केली. दरम्यान येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन नाशिक येथे भेटण्याची सूचना मंत्री महाजन यांनी पांडुरंग शेळके यांच्या दूरध्वनी वरून बोलताना दिली.
संतू पाटील झांबरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
पालखेड डावा कालव्याची आणि धरणातील पाणी साठ्याची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे हेच आमचे प्राधान्य आहे. शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या न्याय्य लढ्यात सहभागी होऊ, अशी ठाम ग्वाही विविध पदाधिकाऱ्यांनी दिली. आता पालकमंत्री महाजन यांच्या सोबत पाणी आवर्तन सोडण्यावर बैठकीत काय निर्णय होतो त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
या बैठकीला श्री. झांबरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर देशमुख, तात्या लहरे, सचिन आहेर, सर्जेराव सावंत, किरण चरमळ, हरिभाऊ महाजन, बाळासाहेब गायकवाड, सुरेश कदम, श्रावण देवरे, विजय मोरे, झुंजार देशमुख, सुभाष गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, नारायण गायकवाड, परसराम सोनवणे, सुभाष सोनवणे, अरुण गोसावी, रघुनाथ सोनवणे, रावसाहेब बागूल, जफर पठाण, प्रदीप कानडे आदी उपस्थित होते.
--------------
कोट
दुष्काळ असला तरी जिल्ह्यातील सर्व धरणात अद्यापही पुरेसे पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित ठेऊन शेतीसाठी दोन आवर्तन देणे शक्य आहे. धरणात आजही ९२ टक्के पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी तात्काळ पालखेडला आवर्तन द्यावे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून पाण्यासाठी प्रसंगी आंदोलनही करू.
- संतू पाटील झांबरे, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना
--------------