A storage tank of a scheme that supplies water to the city
A storage tank of a scheme that supplies water to the city esakal

Nashik: गंगासागर तलावाला सौंदर्यीकरणातून मिळणार झळाळी! अमृत 2 योजनेंतर्गत भुजबळाच्या प्रयत्नांतून 5 कोटींचा प्रकल्प मंजूर

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून निधीला मान्यता मिळाली आहे.

येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या परिसराच्या देखणेपणात अजून भर पडणार असून, गंगासागर तलावाच्या पुनरुज्जीवन करण्यासोबतच अमृत दोन योजनेंतर्गत चार कोटी ९६ लाखांच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे.

गंगासागर तलावाच्या परिसरात हरित क्षेत्र विकसित होणार आहे. परिसराचे सौंदर्यीकरण करून येथे रस्ता व जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. (yeola Gangasagar lake will get boost from beautification 5 crore project approved by chhagan Bhujbal efforts under Amrit 2 scheme Nashik)

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून निधीला मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या अमृत दोन अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या योजनेंतर्गत सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणीपुरवठ्याबाबत शंभर टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्त्रोत पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेत उद्याने व हरीत क्षेत्र विकसीत करणे, मलप्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे आदी प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

अमृत दोन योजनेंतर्गत शहरातील गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करून त्याठिकाणी सौंदर्यीकरणासाठी येवला पालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव शासनास सादर केला होता.

A storage tank of a scheme that supplies water to the city
Nashik Water Management: 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी कसरत! उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन

मंजुरीसाठी मंत्री भुजबळ यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळाली असून, गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करून त्याठिकाणी सौंदर्यीकरणासाठी चार कोटी ९६ लाखांचा प्रकल्प शासनाने मंजूर केला आहे.

यात केंद्र सरकारचा ५० टक्के, राज्य शासनाचा ४० टक्के, तर नगरपालिकेचा १० टक्के हिस्सा असणार आहे. या निधीतून गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन करून परिसरात हरित क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.

परिसराचे सौंदर्यीकरण करून तेथे रस्ता व जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे येवल्याच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.

A storage tank of a scheme that supplies water to the city
Nashik Political News: येवला गट-गणाची शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर! अनेक नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com