विशेष शिबिरात ४०० हून अधिक नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ येवल्यात भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विशेष शिबिरात ४०० हून अधिक नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ येवल्यात भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on: 
पान-३ मेन YEO26B26988 येवला : नागरिकांना दाखले वाटप करताना पदाधिकारी व अधिकारी. ------------- येवल्यात चारशेवर नागरिकांना दाखले -------------- शासकीय योजनांचाही लाभ ः भटके- विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २ : भटक्या-विमुक्त समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येवला, पारेगाव आणि नागडे येथे झालेल्या विशेष शिबिरांत ४०० हून अधिक नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे तसेच योजनांची माहिती व लाभ देण्यात आला. भटके-विमुक्त विकास परिषद व शासनातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान’ अंतर्गत ही शिबिरे घेण्यात आली. येवला येथील भोई गल्लीतील विठ्ठल मंदिरात झालेल्या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते नागरिकांना प्रत्यक्ष दाखले वाटप करून करण्यात आले. शिबिरात पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे, रेशन कार्ड तसेच नगरपालिकेच्या घरकुल योजनेची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. अनेक वर्षांपासून आवश्यक कागदपत्रांअभावी शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले. तहसीलदार महाजन यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच पालिकेच्या घरकुल अभियानाचे कर्मचारी उपस्थित होते.अभियानाच्या यशस्वितेसाठी भटके-विमुक्त विकास परिषदेचे तालुका समन्वयक राम बगडाने, तालुका सहसमन्वयक अनिल सूर्यवंशी, कृष्णा वडे, शरद राऊळ, धीरज परदेशी व किशोर सोनवणे यांनी परिश्रम घेतले. येवला येथील शिबिरासाठी ‘एस. एम. ग्रुप’चे पप्पू कुमावत, शुभम कुमावत, ज्ञानेश्वर खैरमोडे व संतोष सासे; पारेगाव येथे ग्रामपंचायत पारेगाव व सचिन आहेर मित्र मंडळ; तर नागडे येथे पैठणी क्लस्टरचे राजू परदेशी, रमेश परदेशी व मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com