Onion Crop Market : भाव बेभरवशाचा असूनही विश्वास मात्र कांद्यावरच!

Harvested onions for sale.
Harvested onions for sale.esakal

येवला (जि. नाशिक) : एखादे वर्ष गेले तर जाऊ द्या; पण ज्या कांदा पिकाने दुष्काळी असूनही आपली स्वप्नपूर्ती केली, त्या कांदा पिकावर येवलेकरांचा भारी विश्वास आहे. म्हणूनच यंदा वर्षभर भावात अस्थिरता होती;

पण बेभरवशाचा भाव असूनही लागवडीवर मात्र कुठलाही परिणाम झाला नाही. येथील शेतकऱ्यांनी या पिकावरच विश्वास ठेवून तब्बल २३ हजार हेक्टरवर रब्बी कांद्याची लागवड केली. (yeola growth in summer onion field Rabi onion cultivation on 24 thousand hectares nashik news)

दुष्काळी, आवर्षणग्रस्त व टंचाईग्रस्त असूनही कांदा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे. म्हणूनच विसापूर शिवारातील शेतकऱ्याने बांधलेल्या बंगल्यावरच कांद्याची प्रतिकृती बनविली आहे.

अनेकांच्या झोपड्या जाऊन बंगले आले आणि बंगल्यापुढे टुमदार गाड्याही आल्या. ही सर्व स्वप्नपूर्ती केली आहे ती कांद्याने.. त्यामुळे बाजारभावात कितीही चढ-उतार आले तरी लागवडीवर मात्र शेतकरी परिणाम करत नाहीत. किंबहुना वर्षागणिक येथील कांद्याचे क्षेत्र वाढतच आहे.

अर्धा तालुका उन्हाळ्यात पाण्यासाठी आसुलेला असतो, तेव्हा कांदे घेणार कसे, हा प्रश्न सतावतो. त्यावर अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्याचा पर्याय शोधला असला तरी इच्छा असूनही उन्हाळ कांद्याचे पीक घेता येत नाही. यामुळे लाल व रांगड्या कांद्यातून शेतकरी कामाई करतात. याचमुळे चांदवडपाठोपाठ येवल्यात सर्वाधिक क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड होते.

Harvested onions for sale.
Kite Festival : मला येड लावलंय, लावलंय... पतंगोत्सवाने म्हणत येवलेकर पतंगोत्सवात दंग!

कधी हसविणारा, तर कधी रडविणारा अशी ओळख झालेल्या कांद्याने काही वर्षांत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा हातभार दिला आहे. चार दशकांपासून दुष्काळी असलेल्या या तालुक्याबतील शेतकऱ्यांचे कांदा हे प्रमुख पीक असून, याच पिकाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि लाइफस्टाइल बदलवलेली आहे.

तीन-चार वर्षात समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी परिस्थितीला न जुमानता कांद्याची लागवड करत आहेत. पाच वर्षांपूर्वी तालुक्याचे कांद्याचे क्षेत्र ३० हजार हेक्टरपेक्षाही कमी होते. गेल्या वर्षी विक्रमी ४५ हजार हेक्टरवर लाल, रांगडा, उन्हाळ कांद्याची लागवड झाली.

★ लाल कांदा बेभरवशाचा!

यंदा खरिपात दहा हजारावर हेक्टरमध्ये कांदा लागवड झाली होती. गेल्या वर्षी चाळीतील उन्हाळ काद्याला दर न मिळाल्याने शेतकरी निराश झाला तरी खरीपातील कांदा लागवड टिकून होती. मात्र पावसाने कांद्याचे पीक क्षेत्रातच सडवल्याने क्षेत्रात घट झाली.

या वर्षी खरिपात तब्बल दहा हजार सहाशे चौसष्ट हेक्‍टरवर कांदा लागवड झाली होती. यातील कांदा अद्यापही बाजारात विक्रीला येत आहे. पण भाव समाधानकारक मिळाला नाही आणि उत्पादनही घटल्याने शेतकऱ्यांना यावर्षी कादा बेभरवशाचा ठरला.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Harvested onions for sale.
Dhule News : ‘टक्केवारीच्या भिंती’तून शिवसेनेचे लक्षवेधी आंदोलन; अभियंत्यांचे निलंबन करण्याची मागणी

★ उन्हाळ कांद्याकडे कल..!

खरिपातील कांदा रोपवाटिका सततच्या पावसाने सडल्या होत्या. त्यामुळे एकदा नव्हे, तर दोनदा-तीनदा रोपे तयार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तालुक्यात ३१३७ हेक्टरवर कांद्याचे रोपे शेतकऱ्यांनी घेतले.

तालुक्यात खरीप व लेट खरिपाखालील सरासरी क्षेत्र १७ हजार ५१७ हेक्टर तर रब्बीतील कांदा लागवड क्षेत्रही इतकेच आहे. यंदा खरिपातील कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकरी उन्हाळ कांद्याकडे वळविला आहे.

तालुक्यात १४ हजार ५०० हेक्टरवर रब्बी रांगडा व उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती. आठवड्याअखेर हाच आकडा तब्बल २३ हजार ६२७ हेक्टरवर पोचला. यात तीन ते चार हेक्टरने वाढ होणार आहे.

Harvested onions for sale.
Winter Season : घसरत्या तापमानाने द्राक्षबागांना धोका! कसबेसुकेणे परिसरात पारा 5 अंशाच्या घरात

■ कांदा लागवड क्षेत्र..(हेक्टरमध्ये)

कांदा प्रकार -२०२२-- २०२३

खरीप (लाल) - ६०३९

लेट खरीप (रांगडा) - १०६६४

रब्बी (रांगडा/उन्हाळ) - २३६२७

"कांदा येथील प्रमुख पीक बनले असून, या पिकाने शेतकऱ्यांना आधारही दिला आहे. लाल व रांगड्या कांद्याची वर्षानुवर्षे येवलेकर शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यात अग्रेसर आहे. आता सिंचन सुविधांचे पर्याय उपलब्ध झाल्याने टंचाईग्रस्त असूनही उन्हाळ कांद्याचे पीक शेतकरी घेत आहेत." - अरविंद आढाव, कृषी सहाय्यक, येवला

Harvested onions for sale.
Nashik News : लासलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यांची दुरवस्था; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com