Crimesakal
नाशिक
Yeola Crime : येवला परमिट बारमध्ये पुन्हा देहविक्रीचा पर्दाफाश! बांगलादेशी महिला ताब्यात
Bangladeshi Woman Held in Yeola Lodge Raid : येवला शहराजवळील रायते शिवारातील परमिट बारमधील लॉजवर पोलिसांनी छापा टाकून बांगलादेशी महिला ताब्यात घेतली असून, देहविक्री प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
येवला- शहराजवळील रायते शिवारात नाशिक मार्गावरील परमिट बारमधील लॉजमध्ये अवैधरीत्या देहविक्रय करत असलेल्या बांगलादेशी तरुणीला पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलिसांनी अंदरसूल येथील संशयितास अटक केली. तरुणीला पैशांचे आमिष दाखवून अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.