येवला: अनकाई-बाळापूरदरम्यान मालवाहू ट्रकचा अपघात होऊन उलटल्याने पुणे-इंदूर महामार्गावर येवला ते मनमाडदरम्यान २५ किलोमीटरवर २४ तास वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या वाहतुकीचा फटका शहरातील विंचूर चौफुलीवर मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला. रविवारी (ता. २४) सायंकाळी पाचनंतर वाहतूक सुरळीत झाली.