Yeola Municipal Election
sakal
येवला: येथील उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अर्ज दाखल करून न घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)च्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. १२) पहिल्याच सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. प्रशासनाकडून भेदभाव करण्यात आला असून, याविरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेना नेते कुणाल दराडे व राष्ट्रवादीचे नेते डॉ. संकेत शिंदे यांनी सांगितले.