Yeola News : येवला येथे शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात खळबळ

Farmers’ Road Problem in Paregaon : येवला तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनी शेतकरी कुटुंबाने अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी हस्तक्षेप करून अनर्थ टाळला.
Farmers Protest
Farmers Protestsakal
Updated on

येवला: पारेगाव येथील शेतशिवार रस्ता कागदावरच खुला झाला, प्रत्यक्षात वापरात येत नसून शेतात जाणे मुश्किल झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या पारेगाव येथील शेतकरी कुटुंबाने येवला तहसील कार्यालय आवारात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच अंगावर डिझेल टाकून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेने प्रशासकीय संकुलात मोठी खळबळ उडाली. पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टाळला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com