Nylon Manja
sakal
येवला: शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची शहरात आणि परिसरात संक्रांतीपूर्वीच गुप्त विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र पुन्हा एकदा उघड झाले आहे. शुक्रवारी (ता. ५) शहर पोलिसांनी नागडदरवाजा परिसरात टाकलेल्या छाप्यात नायलॉन मांजाच्या अठरा गुंडाळ्या जप्त करून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.