SBI Theft
sakal
येवला: येथील वर्दळीच्या शनि पटांगण भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून चोरट्याने पाच लाख दहा हजारांची रोकड असलेली पिशवी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँकेत कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि ग्राहकांची गर्दी असताना थेट काउंटरवरून ही रक्कम चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.