येवल्यात भद्रकाली मंदिरात ‘सिद्ध कुंजीका स्तोत्र’ पठण भक्तिमय वातावरणात संपन्न

येवल्यात भद्रकाली मंदिरात ‘सिद्ध कुंजीका स्तोत्र’ पठण भक्तिमय वातावरणात संपन्न
Published on: 
फोटो २ कॉल YEO26B27172 येवला : येथील श्री भद्रकाली माता मंदिरात सिद्ध कुंजीका स्तोत्र पठणात सहभागी महिला. ------------------- येवल्यात ‘सिद्ध कुंजिका स्तोत्र’ पठण भद्रकाली मंदिरात सुवर्णकार महिला मंडळ व तगारे प्रतिष्ठानचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१४ : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त येथील श्री भद्रकाली माता मंदिरात सुवर्णकार महिला मंडळ व तगारे प्रतिष्ठानतर्फे सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शहर व परिसरातील महिला आणि कुमारिकांनी मोठी उपस्थिती होती. मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमासाठी महिलांनी लाल व पिवळ्या रंगांच्या साड्या, तर कुमारिकांनी पांढऱ्या पंजाबी पोशाखासह लाल-पिवळ्या ओढण्या परिधान केल्या होत्या. आयोजकांतर्फे उपस्थितांना स्तोत्राच्या प्रती वितरित करण्यात आल्या. दुपारी तीन ते पाच या वेळेत सर्व महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने एकमुखाने ‘सिद्ध कुंजिका स्तोत्रा’चे पठण केले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक उपक्रम व कार्यक्रम होत आहेत. नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष रुपेश घोडके यांच्यासह माधवराव गंगापूरकर, सुभाष विसपुते, दिलिपशेठ माडीवाले, नारायण जाधव, अमोल उदावंत, अनिल खरोटे, श्रीकांत वडनेरे, मयूर चांदवडकर, दीपक नाशिककर, कपिल नाशिककर, अरुण भाऊ गायकवाड, सदानंद मैंद, राजू गंगापूरकर, संदीप मेटकरी, मोहन माडीवाले, अक्षय भोसले व शिरीष दुसाने, महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिता चांदवडकर यांच्यासह अश्विनी घोडके, मीना माडीवाले, पूनम घोडके, पूनम पावटेकर, सुप्रिया दुसाने, जयश्री निकुंभ, वर्षा खरडकर, प्रिया पावटेकर, वैशाली उदावंत व पल्लवी नाशिककर प्रयत्नशील आहे. ----------------
Marathi News Esakal
www.esakal.com