विजयादशमीला सामुदायिक सीमोल्लंघनाची येवलेकरांची ३५० वर्षांची परंपरा..!

विजयादशमीला सामुदायिक सीमोल्लंघनाची येवलेकरांची ३५० वर्षांची परंपरा..!
Published on: 
पान-२ मेन -------- दसराविशेष--लोगो -------- सामुदायिक सीमोल्लंघनाची ३५० वर्षांची परंपरा -------------- येवला ः गंगादरवाजा भागात शमी पूजन, सोने वाटप अन बालाजीच्या रथाची मिरवणूक ------------- संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१९ : साडेतीनशे वर्षांची परंपरा, एकजुटीचा उत्सव आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान जपणारे येवलेकरांचे सामुदायिक सीमोल्लंघन म्हणजे विजयादशमीचे अनोखे आकर्षण अन परंपरा जतन... दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील गंगादरवाजा परिसरात हजारो नागरिक एकत्र येत सीमोल्लंघन करतात. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, मात्र पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने अनुभवायला मिळते. उत्सवप्रिय येवलेकरांच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा हा सोहळा शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतो. रंगपंचमी,पतंगोत्सवासह सर्व सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची या शहरांची परंपरा आहे.दसऱ्यालाही कोठेही नाही अशा अनोख्या परंपरेतून हिंदू बांधव सीमोल्लंघन करतात. महाराष्ट्रात कोठेही नाही अशा अनोख्या परंपरेतून प्रत्येक समाज आपला समूह करून सीमोल्लंघन करतात.या परंपरेनुसार सबंध शहर अन आख्खा परिवार सायंकाळी ६ वाजेनंतर गंगादरवाजा भागात जमतो. याच परिसरातील गंगावेशीतून भैरवनाथ मंदिर परिसरात नागरिक जमतात. लेवा पाटीदार समाज येथील स्वामी मुक्तानंद - एंझोकेम विद्यालयाच्या प्रांगणात एकत्रित येऊन सिमोलंघन करतात. ब्रह्मवृन्दाच्या मंत्रघोषात प्रत्येकाणे विधीपूर्वक शमी पूजन केले जाते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवघरात बसवलेल्या घटात उगवलेले धान प्रत्येक व्यक्ती बरोबर घेवून येतो आणि या ठिकाणी शमिला वाहतो.परिसरात विविध समाज बांधवांच्या सतरंज्या अंथरल्या जाऊन प्रत्येकजन आपापसात प्रेमपूर्वक चौकशी करून केळीचा प्रसाद वाटतो.नंतर आपापल्या घरी जाऊन सौभाग्यवतीकडून औक्षण करून घेतो.लहान मंडळी वडीलधाऱ्या मंडळीच्या घरी जाऊन सोनं (आपट्याची पानं ) देत आशीर्वाद घेतात. गंगादरवाजा भागात सीमोल्लंघनासाठी जमलेल्या येवलेकरांच्या गर्दीने जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.प्रत्येक जण देवाला सोने देत या ठिकाणी सीमोल्लंघनाचा आनंद घेतो. त्यानंतर शहरात चौकाचौकात युवकांचे थवे उभे राहून सोनं वाटत ही परंपरा आजही पाळली जाते.तसेच विविध मंदिरे, मित्र आप्तेष्टांच्या घरी जाऊन एकमेकांना सोने वाटून येवलेकरांनी दसऱ्याचा सण साजरा करतात. १६-१ बालाजीच्या रथाची निघते मिरवणूक दसऱ्याचे खास वैशिष्ट्य़ म्हणजे भगवान बालाजीचा रथ १० दिवस वेगवेगळ्या वाहनावर स्वार होवून शहरात फिरतो. भाविक या रथाला आपल्या घरी निमंत्रित करतात. दसऱ्याच्या दिवशी बालाजी घोड्यावर बसून नागरिकांसमवेत सीमोल्लंघन करतात अशी आख्यायिका आहे.दर्शन घेतल्यावर रथाचे सारथी व सोबत आलेले भाविक यांना कानगी दिली जाते.एकादशीला अर्थात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा रथ शहरापासून तीन कि.मी. अंतरावरील नागडे गावात नेला जातो. नदीत बालाजीला स्नान घातले जाते व नागडे ग्रामस्थ बालाजीचे दर्शन घेतात.त्यानंतर रथ पुन्हा येवल्यात आणला जातो. १६-१ कोटमगावला होमपूजा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या यात्रेचा समारोप दसऱ्याच्या निमित्ताने होत असतो.या निमित्ताने आदल्या दिवशी म्हणजे आज या ठिकाणी होम पेटवण्यात आला आहे.आज सायंकाळी अनेक भाविकांनी होमात नारळाची आहुती देऊन या होमाचे दर्शन घेतले.उद्या दसऱ्याच्या निमित्ताने येथील यात्रेचा समारोप होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com