नाशिक/येवला/सिन्नर- येवला तालुक्याला रविवारी (ता. १३) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. सिन्नर तालुक्यासह निफाडच्या काही भागांतही १५ ते २० मिनिटे वादळासह पाऊस झाल्याने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. पातीत पाणी गेल्याने हे कांदे सडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, येवल्यात मशिदीवरील मिनारवर वीज कोसळून नुकसान झाले; तर मातुलठाण येथे गोठ्याला आग लागल्याची घटना घडली.