Nylon Manja Ban
sakal
येवला- सिन्नर: जीवघेण्या नायलॉन मांजा प्रकरणी पोलिस, प्रशासन जनजागृती करीत असून, कारवाई तीव्र केलेली असताना जिल्ह्यात अधूनमधून हा जीवघेणा मांजा सापडत आहे. येवला आणि सिन्नर येथे पोलिस व पालिकेच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत एकूण ११८ रीळ जप्त केले आहेत. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, यापुढे ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल.