येवला- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालकांनी बुधवारी (ता. १६) मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.