पोलिस चौकीत बसून अन वाहतुकीची तीन किलोमीटरवर कोंडी!

पोलिस चौकीत बसून अन वाहतुकीची तीन किलोमीटरवर कोंडी!
Published on: 
मेन YEO26B27125 येवला : विंचूर चौफुलीवर संतप्त झालेले पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी पोलिसांना जाब विचारत वाहतूक मोकळी करताना. ---------------- पोलिस चौकीत अन रस्त्यावर कोंडी ------------ येवला ः तीन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा, संभाजी पवारांनी जाब विचारत स्वतः केली वाहतूक मोकळी ------------- ​सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१२ : मालेगाव- मनमाड- येवला - कोपरगाव महामार्गावर प्रचंड वाहतूक वाढली आहे. त्यातच येथील चौफुलीवर काँक्रिटीकरणासाठी खोदकाम झाल्याने आठवड्यापासून रोजच दोन्ही बाजूने तीन ते पाच किलोमीटरपर्यंत वाहतुकीच्या रांगा लागत आहे. वाहतूक कोंडी झालेली असतानाही वाहतूक उपनिरीक्षक आणि होमगार्ड विंचूर चौफुलीवरील पोलिस चौकीत बसून असल्याने पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवाय स्वतः या ठिकाणी उभे राहून कोंडी झालेली वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला. ---------------- जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नवरात्रोउत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिराला भेट देत वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेतल्यानंतरही रविवारी पोलीस अधिक्षकांच्या भेटीनंतर नगर- मनमाड आणि येवला- संभाजीनगर मार्गांवर वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा सकाळपासून रात्रीपर्यंत लागलेल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून हा प्रकार नित्याचा झाल्याने आता सहनशीलतेचा अंत सुटत आहे. माजी सभापती संभाजी पवार यांनी वाहनांच्या लागलेल्या रांगा बघून विंचूर चौफुलीवर भेट दिली असता वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक माळोदे आणि काही होमगार्ड केबिनमध्ये बसल्याचे तर कंत्राटी कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करताना आढळून आले. हे चित्र बघून संतप्त झालेल्या संभाजी पवार यांनी वाहतूक कोंडीविषयी पोलिस उपनिरीक्षक माळोदे यांना जाब विचारत केबिनच्या बाहेर येण्यास सांगितले. यावर मालोदे यांनी बाहेर येण्यास प्रथम नकार देत नंतर बाहेर येऊन साहेबांना फोन करतो सांगितले. १४-१ साहेब आले अन यंत्रणा हलली हे साहेब कॅबिनमध्ये अन वाहतूक पोलिस निरीक्षक दिनेश खैरनार आणि वाहतूक पोलिस अनकाई किल्याजवळ असल्याचे समजताच आक्रमक झालेल्या संभाजी पवार यांनी येवल्यात बोलावले. त्यांनाही वाहतूक कोंडीचा जाब विचारल्यानंतर पोलिस निरीक्षक खैरनार यांनी बरोबर असलेल्या आठ वाहतूक पोलिसांना विंचूर चौफुलीवर तैनात केले. त्यानंतर व्हाहतुकीच्या लांब लागलेल्या रांगा कमी झाल्या.कोंडीवर कायमची उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही पवार यांनी दिला आहे. २०-२ नियोजनाचा अभाव अन खोदकाम कोटमगाव येथे राज्यभरातून भाविक येणे सुरु आहे. दुसरीकडे मंगळवारी (ता.१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातून भीम सैनिक येवल्यात दाखल होत आहेत. अशा महत्त्वाच्या सण- उत्सवांच्या तोंडावर प्रशासनाने कोणतेही पूर्वनियोजन न करता विंचूर चौफुलीजवळ राज्यमार्गाच्या एका बाजूने रस्ते खोदून काँक्रीटीकरणाचे मागील आठवडयापासून काम सुरू केल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरापासून २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. पोलिसांची अनास्था आणि प्रशासनाचे ढिसाळ नियोजन यास कारणीभूत आहे.पोलिसांनी कंत्राटी कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नेमले असून होमगार्ड आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर राज्य मार्गाची वाहतूक सद्या सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com