Severe Crop Damage in Rural Yeola Due to Rain : येवला शहरातील मेन रोड आणि फत्तेबुरूज नाक्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
येवला, ता. २५ : आठवडाभरापासून सातत्याने कोसळणाऱ्या बिगरमोसमी पावसाने रविवारी (ता. २५) पुन्हा वेगवान वादळासह हजेरी लावली. शहरात सुमारे तासभर पाऊस सुरू असल्याने रस्त्यांना नदीचे रूप आले, तर शेतकऱ्यांचेही या पावसाने मोठे नुकसान केले.