पान-४ सेकंडमेन
YEO26B27294
येवला : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ तसेच विविध पदाधिकारी.
---------------
नवीन योजना पाण्याची गरज पूर्ण करेल
--------------
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते १६० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२३ : येवला शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली आहे. याद्वारे पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री भुजबळ यांचे हस्ते शुक्रवारी (ता.२३) महात्मा फुले नाट्यगृह येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान येसगाव येथील साठवण तलावात आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, अरुणमामा थोरात, माजी सभापती संभाजीराजे पवार, डॉ. शेफाली भुजबळ, विधानसभाध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी प्रास्ताविक केले.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येची आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत २.० अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १६० कोटी २५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवी बळकटी मिळणार आहे. या योजनेचे नियोजन सन २०५६ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून करण्यात आले असून, शहराला सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल असे मंत्री भुजबळ म्हणाले.
या योजनेअंतर्गत येसगाव येथे ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव उभारण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून या तलावात पाणी आणण्याचे नियोजन आहे. ऊर्जा बचतीच्या दृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. ही योजना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.
माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भोलाशेठ लोणारी, हुसेन शेख, गटनेते गणेश शिंदे, दीपक लोणारी, दत्ता निकम, मोहन शेलार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, चैताली सचिन शिंदे, प्रवीण बनकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------