Crime
sakal
नाशिक: येवला- विंचूर रोडवरील एका बंगल्यात बनावट विदेशी मद्यापासून मद्यनिर्मितीचा कारखाना चालविला जात होता. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या येवला भरारी पथकाने शुक्रवारी (ता. १६) मध्यरात्री छापा टाकून अड्डा उद्ध्वस्त केला. या वेळी बनावट मद्यासह मद्यासाठी लागणारे सुमारे तीन लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, तिघांना अटक केली आहे.