दुष्काळामुळे पिण्याचे पाणी,चारा नियोजन युद्धपातळीवर करा आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवल्यात आढावा बैठक

दुष्काळामुळे पिण्याचे पाणी,चारा नियोजन युद्धपातळीवर करा आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवल्यात आढावा बैठक
Published on: 
पान-४ मेन फोटो-27042 येवला : टंचाई आढावा बैठकीत बोलताना आमदार पंकज भुजबळ. शेजारी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मोहन शेलार आदी. पाणी, चारा नियोजन युद्धपातळीवर करा आमदार पंकज भुजबळ ः येवल्यात दुष्काळी परिस्थितीबाबत आढावा बैठक सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ७ : पावसातील खंड आणि अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी आणि दूरदृष्टीने नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच चारा व पाणी, पशुधनाची अचूक नोंदणी आणि कृषी क्षेत्रातील अडचणींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार पंकज भुजबळ यांनी दिल्या. येथील संपर्क कार्यालयात भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची आढावा बैठक झाली. यावेळी पिण्याचे पाणी, संभाव्य पाणीटंचाई, चाऱ्याची उपलब्धता, जनावरांची नोंदणी, पशुसंवर्धन विभागाची तयारी, कृषी क्षेत्राची सद्यःस्थिती तसेच शेतकऱ्यांना आवश्यक मदत याचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, बाळासाहेब गुंड, रतन बोरनारे, नवनाथ काळे, सुनील पैठणकर, निसार शेख, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते. मतदारसंघातील गावनिहाय पाणीपुरवठ्याची सद्यःस्थिती, उपलब्ध जलस्रोत आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई याची माहिती घेऊन टंचाईग्रस्त गावांचे पूर्वनियोजन करण्याच्या सूचना आमदार भुजबळ यांनी दिल्या. विहिरी, कूपनलिका, पाणीपुरवठा योजना आणि इतर उपलब्ध जलस्रोतांची सद्यःस्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था वेळेत करावी. पाणीटंचाईच्या शक्यतेबाबत प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना सुरू कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. तालुक्यातील पशुधनाची गावनिहाय अचूक नोंदणी करून उपलब्ध चारा, भविष्यातील चाऱ्याची गरज याचा ताळमेळ साधावा, आवश्यकतेनुसार चारा डेपो, चारा छावण्या तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था याबाबत पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. पावसातील खंडाचा पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यःस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचाही या वेळी आढावा घेतला. प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी, तसेच आवश्यक असल्यास सर्वेक्षण, पंचनामे आणि अहवाल शासनाकडे वेळेत सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com