येवला- जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर साडेचार वर्ष उलटल्यानंतरही अनेक सदस्यांनी जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अखेर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी थेट ५९ सदस्यांना अपात्र ठरवले आहे. यामध्ये काही आजी-माजी सरपंचांचाही समावेश असून, हा निर्णय येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.