सोयाबीनला येवल्यात मिळाला ७२५१ रुपयांचा उच्चांकी भाव बाजारपेठेत तेजी

सोयाबीनला येवल्यात मिळाला ७२५१ रुपयांचा उच्चांकी भाव बाजारपेठेत तेजी
Published on: 
येवल्यात सोयाबीनला सव्वा सातहजार भाव ---------- नवीन आवक सुरू, मर्यादित उपलब्धतेमुळे दराला आधार --------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १६ : खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागले असतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ७२५१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाळा. नव्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली असली, तरी बाजारात उपलब्ध मालाचा तुटवडा आणि खरेदीदारांकडून असलेली मागणी यामुळे दराला चांगला आधार मिळत असल्याचे चित्र आहे. यंदा सोयाबीनचे क्षेत्र स्थिर राहिले असतानाच दुष्काळामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याची परिस्थिती आहे. त्यातुलनेत सोयाबीनच्या भावातील तेजीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आगामी काळात आवक आणि मागणी यांचा समतोल राहत बाजारभावात तेजी राहावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली असून रोज ३ हजार क्विंटलच्या आसपास आवक होत आहे. भावात तेजी असल्याने तयार झालेला सोयाबीन विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी येणाऱ्या मालाचे प्रमाण, सोयाबीनची गुणवत्ता, ओलाव्याचे प्रमाण आणि खरेदीदारांची गरज या घटकांचा दरावर परिणाम होतो. बाजारात माल मर्यादित राहिला आणि खरेदीदारांकडून मागणी कायम राहिली तर भावाला आधार मिळू शकतो १६-१ भाववाढीची कारणे सोयाबीनचा वापर तेलनिर्मिती तसेच पशुखाद्य उद्योगात होत असल्याने त्याला बाजारपेठेत मागणी असते. त्यामुळे स्थानिक बाजारातील आवक आणि प्रक्रिया उद्योगांकडून होणारी खरेदी यांचा दराला फायदा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. १६-१ बाजारभावाकडे लक्ष यंदाच्या हंगामात वाढलेला उत्पादन खर्च, दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाच्या दराबाबत मोठी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला भाव मिळणे दिलासादायक ठरत आहे. भाव वाढण्यामागची प्रमुख कारणे बाजारात मर्यादित आवक : अल्प पाऊस अन दुष्काळामुळे सर्वत्र उत्पादनात घट झाली आहे. बाजारात चांगल्या सुक्या आणि दर्जेदार मालाची आवक मर्यादित आहे. सध्या बाजारात आलेले सोयाबीन हे ''नवे'' असले तरी, व्यापारी वर्गाला अपेक्षेपेक्षा कमी आवक मिळत असल्याने मालाची चणचण भासत आहे. --------- कोट बाजारातील आवक, मालाची गुणवत्ता आणि खरेदीदारांची मागणी यानुसार दरात चढउतार होत असतात. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी योग्य सुविधा,चांगला बाजारभावाची उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. शेतकऱ्यांनी बाजारातील दरांची माहिती घेऊनच शेतीमाल विक्रीचा निर्णय घ्यावा.” - वसंतराव पवार, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला -------------- नवीन सोयाबीनची बाजारात आवक सुरू झाली आहे. सोयाबीनची गुणवत्ता, ओलाव्याचे प्रमाण, बाजारातील उपलब्ध माल आणि व्यापारी व प्रक्रिया उद्योगांकडून असलेली मागणी या बाबी महत्त्वाच्या ठरतात. सध्या सोयाबीनचे दर तेजीत असून शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतमाल विक्री करावा. - कैलास व्यापारे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती,येवला -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com