esakal | PHOTO : 'यिन' अधिवेशनाला दिमाखात सुरवात! सभापतीपदी आकाश शिंदे, उपसभापतीपदी वर्षा लोंढे
sakal

बोलून बातमी शोधा

yin session

नाशिक : 'सकाळ माध्यम समूहा'च्‍या यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्‍या अधिवेशनाला शुक्रवारी (ता.३०) दिमाखात सुरवात झाली. राज्‍यभरातून आलेल्‍या शॅडो कॅबिनेटच्‍या मंत्री, पालकमंत्री यांच्‍यात उत्‍साह बघायला मिळत आहे. अधिवेशनाची सुरवात करतांना आकाश शिंदे यांची अधिवेशनाच्‍या सभापतीपदी तर वर्षा लोंढे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

PHOTO : 'यिन' अधिवेशनाला दिमाखात सुरवात!

sakal_logo
By
सकाळ टीम
यिन'चे तीन दिवसीय अधिवेशन नाशिकच्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात होत आहे. या अधिवेशनानिमित्त राज्‍यभरातील प्रतिनिधी काल (ता.२९) नाशिकला दाखल झाले.

मुक्‍त विद्यापीठाच्‍या यश-इन सभागृहात शुक्रवार (ता.३०) सकाळपासून ऊर्जात्‍मक वातावरण बघायला मिळाले.

अधिवेशनाचे नियम व अन्‍य सूचना दिल्‍यानंतर सभापती व उपसभापतीपदाची निवड करण्यात आली. यावेळी आकाश शिंदे यांची अधिवेशनाच्‍या सभापतीपदी बहुमताने निवड करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी वर्षा लोंढे यांचीही बहुमताने निवड करण्यात आली.

यानंतर कामकाज पुढे चालवितांना, सर्वप्रथम 'यिन' शॅडो कॅबिनेटचे मुख्यमंत्री अजय खांडबहाले यांनी सभागृहाला संबोधित केले.

आगामी तीन दिवस कामकाजाची दिशा विशद करतांना विविध मुद्यांवर त्‍यांनी मनोगतातून सभागृहाचे लक्ष वेधले. कोरोना काळात राज्‍यभरातील ३६ जिल्‍ह्‍यातील स्‍वयंसेवकांना घेऊन राबविलेल्‍या उपक्रमाचा लेखाजोखा यावेळी सादर करण्यात आला.

अगदी विधानसभेच्‍या सभागृहाप्रमाणे 'यिन' अधिवेशनात कामकाज सुरु झाले आहे. मान्‍यवरांच्‍या मनोगतावेळी बाक वाजवत शिस्‍तप्रियतेचे दर्शन सहभागी प्रतिनिधींनी घडविले.

हेही वाचा: कृष्णा-गोदावरीचे पेटले पाणी! आंध्र अन् तेलंगणामध्ये खदखद

हेही वाचा: ‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन

loading image
go to top