

Nashik
esakal
कोरोनाच्या काळात जगाने पैशाची ताकद पाहिली…
पण त्याच काळात अनेकांनी एका गोष्टीसमोर स्वतःला हतबल पाहिलं ऑक्सिजन.
पुण्यातील अभियंता योगेश चौधरी यांच्यासाठीही तो काळ आयुष्य बदलून टाकणारा ठरला.संपूर्ण कुटुंब कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होतं.वडिलांना तब्बल १९ दिवस ऑक्सिजन सपोर्टवर ठेवावं लागलं.प्रत्येक दिवस भीतीचा होता.मशीनवर चालणाऱ्या श्वासांची किंमत ते जवळून पाहत होते.सुदैवाने संपूर्ण कुटुंब त्या संकटातून सुखरूप बाहेर आलं… पण योगेश यांच्या मनात एक प्रश्न कायमचा कोरला गेला “ज्या ऑक्सिजनसाठी माणूस इतका हतबल होतो,तो निर्माण करणाऱ्या निसर्गासाठी आपण काय करतो?”