Yogeshwar Dutt
sakal
नाशिक: महाराष्ट्रातील कुस्तीपटू स्थानिक व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्याने चमक दाखवत आहेत. मात्र पारंपरिक मातीवरील कुस्तीकडे अधिक झुकाव असल्याने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यात मर्यादित ठरत असल्याचे स्पष्ट मत ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी व्यक्त केले.