दापूरच्या बालचित्रकारांची चित्रे नेहरु आर्ट गँलरीत बालदिनी होणार प्रदर्शन

दापूरच्या बालचित्रकारांची चित्रे नेहरु आर्ट गँलरीत  बालदिनी होणार प्रदर्शन
Published on: 
फोटो-23273 दापूर ः गोकुळ काळे, सुयश शेळके यांनी साकारलेली चित्रे. बालचित्रकारांची चित्रे नेहरू आर्ट गॅलरीत सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ३१ ः दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील बालचित्रकार गोकुळ काळे, सुयश शेळके यांच्या चित्रांचे प्रदर्शन नेहरू आर्ट गॅलरीत भरणार आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हे प्रदर्शन भरणार असून, सात दिवस सुरू राहणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजे १४ नोव्हेंबरला बालचित्रकारांना त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याची संधी दिली जाते. मुंबई येथील नेहरू आर्ट गॅलरीत बालदिशा या चित्रप्रदर्शनासाठी झाली आहे. नेहरू आर्ट गॅलरी ही व्यावसायिक चित्रकारांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. साधारण फॉर्म भरल्यानंतर दोन ते तीन वर्षांनी व्यावसायिक चित्रकार यांना संधी दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील बालकलाकारांना कमी वयात मोठी संधी मिळणार आहे. शालेय समितीचे अध्यक्ष श्रीराम आव्हाड, मोहन काकड, तंटामुक्ती अध्यक्ष कचूनाना आव्हाड, सनराईज रूरल फाउंडेशनचे अध्यक्ष आर. एम. आव्हाड, सदस्य गणेश आव्हाड, सरपंच वनिता आव्हाड, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष डी. पी. आव्हाड, उपाध्यक्ष किसन आव्हाड, ज्ञानेश्वर साबळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष भगवान आव्हाड, सोसायटी अध्यक्ष शिवाजी दराडे, मुख्याध्यापक डॉ. सुदर्शन धस, पर्यवेक्षिका योगिता मुरतडक यांनी स्वागत केले. .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.