
मालेगाव (जि. नाशिक) : झाडी (ता. मालेगाव) येथील राजेंद्र कारभारी देवरे (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. (young farmer committed suicide by hanging himself in field Nashik Latest Marathi News)
याउलट ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. सातबारा उताऱ्यावर कुठलीही कर्ज नोंद नसल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. झाडी शिवारातील शेतात गळफास लावलेला देवरे यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी (ता. १) सायंकाळी ही दुर्घटना घडली.
यामुळे झाडी, एरंडगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्री. देवरे यांची पाऊण एकर जमीन आहे. त्यांच्यावर श्रीराम फायनान्सचे ट्रॅक्टरचे, तसेच हातउसनवार देखील कर्ज आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.