आपल्या लेकाची 'ती' अवस्था पाहून वडीलांचे गळाले अवसान

young farmer death with an electric shock
young farmer death with an electric shockesakal

नामपूर (जि. नाशिक) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करून तरुण शेतकरी दिलीप वाघ यांनी आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीचे नंदनवन केले होते. शेतातील खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरकडे गेले आणि विजेच्या धक्क्याने त्यांच्या आयुष्यावर घाला घातला. आपल्या डोळ्यादेखत लेकाची ती अवस्था पाहून दिलीप यांच्या वडीलांचे अवसान गळाले.

पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार सुटला मागे

दिलीप वाघ गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आई वडीलांसोबत आपल्या शेतात घर करून राहत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करून त्यांनी आपली वडिलोपार्जित असलेली शेतीचे नंदनवन केले होते. रविवारी (ता. १९) सकाळी त्यांच्या शेतातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे आपल्या वडीलांसोबत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरकडे गेले असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का लागल्याने त्यांचा करुण अंत झाला. या घटनेनंतर सुधाकर वाघ, किशोर वाघ, किरण वाघ, अरुण वाघ आदींनी त्यांना तातडीने नामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांनतर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ श्वेता बोरसे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी चार वाजता शोकाकूल वातावरणात टेंभे गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत मितभाषी व कष्टाळू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची काटवन खोऱ्यात ओळख होती. टेंभे वरचे ता बागलाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक किशोर वाघ यांचे ते मोठे बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

young farmer death with an electric shock
17 व्या वर्षीच जगाचा निरोप; वडिलांचे स्वप्नही अपूर्णच
young farmer death with an electric shock
नाशिक : चिमुकल्यांचे पंचगव्य स्नानातून आरोग्य संवर्धन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com