प्रभाकर बच्छाव : येसगाव- फिरत्या चाकावर मातीला आकार देण्याबरोबरच संसाराचा तोल सांभाळण्याची कसरत सध्या ग्रामीण भागातील कुंभार समाजाला करावी लागत आहे. मागणी अत्यल्प, परिणामी उत्पन्न कमी परंतु कष्ट जास्त, त्यामुळे या समाजातील तरुण पिढीचा कल उद्योगधंद्यांकडे असल्याने आपल्या परंपरागत व्यवसायाकडे पाठ फिरविताना ते दिसत आहेत.